सर्वांसाठी बहुउपयोगी ओरिगामी | Multipurpose origami for all

Origamy

सर्वांसाठी बहुउपयोगी ओरिगामी

कागदापासून आकर्षक वस्तू तयार करण्याची कला म्हणजे ओरिगामी. दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी चीन आणि जपानमध्ये विकसित झालेली ओरिगामीची कला आज जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचली आहे. ओरिगामी ही कागदाची घडी घालण्याची पारंपारिक जपानी कला आहे, जिथे कागद कापून किंवा चिकटवल्याशिवाय घड्या घालून कागदाच्या एका शीटचा वापर करून गुंतागुंतीची आणि नाजूक कलाकृती तयार करतात. "ओरिगामी" हा शब्द जपानी शब्द "ओरू" (फोल्ड करण्यासाठी) आणि "कामी" (कागद) पासून आला आहे. भारतात या कलेचा १९८१ पासून प्रसार झाला. ओरिगामी साध्या, नवशिक्या-स्तरीय निर्मितीपासून अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीच्या डिझाइनपर्यंत असू शकते. पारंपारिकपणे, ओरिगामी डिझाइनमध्ये प्राणी, पक्षी, फुले आणि भौमितिक आकारांचा समावेश होतो, परंतु आता ओरिगामी कलाकार वास्तववादी ते अमूर्त अशा अत्याधुनिक स्वरूपापर्यंत विविध विषयांचा शोध घेतात.

    ओरिगामीमध्ये अचूक फोल्डिंग तंत्र आणि भौमितिक तत्त्वांची सखोल माहिती आवश्यक असते. कागदाच्या सपाट शीटचे त्रिमितीय आकृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी क्रिझ आणि फोल्ड काळजीपूर्वक लक्षात घेतले जात. ओरिगामी कलाकार अनेकदा फोल्डिंग डायग्राम किंवा विशिष्ट मॉडेल्स तयार करतात, परंतु अनुभवी अभ्यासक त्यांची रचना विकसित करू शकतात.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • ओरिगामीसाठी सामग्री
  • कागदाच्या शोधानंतर ओरिगामीचा जन्म
  • कागदाला घडी घालण्याचे तंत्र
  • अवकाश विज्ञानातही ओरिगामीचा उपयोग
  • ओरिगामीचे फायदे
  • निष्कर्ष

ओरिगामीसाठी सामग्री | Raw material for origami

आपल्या हाताची बोटं आणि कागद, एवढीच काय ती ओरिगामीसाठी सामग्री लागते आणि त्याद्वारे कागदांना विशिष्ट प्रकारे घड्या घालून निर्माण होतात,प्राणी-पक्षी-कीटक-फुलपाखरं-मानवी आकार, फुलं-पानं, तारे, विविध आकाराचे डबे, वाहनं, डायनासॉर, सजावटीसाठी सुंदर वस्तू आणि विविध भौमितिक कलाकृती. कात्री आणि गोंद यांचा वापर न करता या सगळ्या कलाकृती तयार करण्याचा आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मनमुराद लुटता येतो.

कागदाच्या शोधानंतर ओरिगामीचा जन्म | Origami was born after the discovery of paper

सुमारे पावणेदोन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये कागदाचा शोध लागला. त्यानंतर चीनमध्ये ही कला जन्मली आणि काही काळानंतर जपानी प्रवाशांनी कागद आणि त्याबरोबर ही कलाही जपानमध्ये नेली आणि जपानमध्ये ही कला खर्‍या अर्थाने विकसित झाली. मात्र सुरुवातीच्या काळात कागद खूप महाग असल्यामुळे ओरिगामी ही फक्त श्रीमंतांची कला होती. नंतर कागद स्वस्त आणि सहज उपलब्ध व्हायला लागल्यावर सर्वसामान्य लोक ही या कलेचा आनंद घेऊ लागले. 

कागदाला घडी घालण्याचे तंत्र | Paper folding technique

कागदाला घडी घालणं हे मूलभूत तंत्र वापरून आजवर ओरिगामीचे अनेक प्रकार विकसित झाले आहेत. काही प्रकारांत फक्त एकच कागद वापरतात, तर काही प्रकार एकापेक्षा जास्त कागद वापरले जातात, त्यास ‘मोड्युलर ओरिगामी’ असे म्हणतात. यात अनेक कागदांना एकाच प्रकारच्या घडया घालून, तयार झालेली ‘युनिट्स’ एकमेकांत (गोंद न वापरता) अडकवून/गुंतवून आकर्षक वस्तू तयार होतात. या प्रकाराने चेंडूसारख्या गोल वस्तू, तारे, डबे अशा सुंदर शोभिवंत वस्तू तयार होतात. याचाच आणखी एक प्रकार म्हणजे ‘थ्री-डी ओरिगामी’, यात अनेक त्रिकोनी युनिट्स एकमेकांत खोचून हंस, फुलांची परडी अशा कलाकृती तयार होतात.ओरिगामीच्या प्रकारानुसार एकरंगी, दुरंगी, अर्धपारदर्शक बनाना स्किन कागद, हँडमेड इ. कागद वापरला जातो.ऍक्शन ओरिगामी अंतर्गत हलत्या वस्तू शेपूट ओढल्यावर सोंड उंचावणारा हत्ती, बोलणारे ओठ, उड्या मारणारा बेडूक अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण केल्या जातात.कागदाच्या दोन अरुंद, लांब पट्टया (रिबिनी) एकमेकांवर काटकोनात ठेवून त्याचा त्रिकोनी किवा चौकोनी ‘गोफ’ विणून त्यापासून आकर्षक वस्तू, आणि दागिनेसुद्धा बनवतात, या प्रकाराला ‘स्नॅपॉलॉजी’ म्हणतात. तर कात्री-गोंद वापरून तयार केलेलं ‘पॉप अप’ शुभेच्छापत्र हे ‘किरिगामी’ प्रकारात येते. हे ओरिगामीचेच उपप्रकार आहेत. 
गेल्या ६०-७० वर्षांत जगाच्या कोनाकोपर्‍यात ओरिगामीचा प्रसार झाला, याचं श्रेय अकिरा योशिझावा या जपानी इंजिनीयरला दिले जाते. यांनी प्राणी-पक्ष्यांच्या कलाकृती तयार करताना कागद थोडा ओला करून घड्या घालण्याची पद्धत शोधून काढली. या पद्धतीने त्यांनी असंख्य नव्या ओरि-कलाकृतींची निर्मिती केली. ओरिगामीच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या सन्मानार्थ जपान सरकारने ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन’ या सर्वोच्च नागरी किताबाने त्यांचा गौरव केला आहे. 

अवकाश विज्ञानातही ओरिगामीचा उपयोग | Origami is also used in space science

आता तर अवकाश विज्ञानातही ओरिगामीचा उपयोग केला जातो. अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेच्या एका उपग्रहाच्या सौर घट प्रणालीसाठी रोबर्ट लँग या ओरिगामीतज्ज्ञाने टॅसलेशन प्रकारानुसार आरेखन केलं. ती प्रणाली छाट्या जागेत घडीच्या पंख्यासारखी सामावली जाऊन, तो उपग्रह अवकाशात गेल्यावर घडी उलगडून सौर घट पूर्णपणे विस्तारला.तसेच शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी ओरिगामीचे अनेक फायदे होतात असं सिद्ध झाल आहे. ओरीगामीमुळे मन एकाग्र व्हायला मदत होते. मनोरुग्ण, व्यसनाधीन व्यक्ती यांना मानसिक स्थैर्य मिळायला मदत होते. दोन्ही हातांच्या बोटांचा वापर होत असल्यामुळे, मेंदूचा उजवा भाग कार्यरत राहतो. मेंदूचा उजवा भाग हा कल्पकता, सर्जनशीलता, नवनिर्मिती, भावनिक प्रगल्भता यांच्याशी निगडीत असतो. त्यामुळे अल्झायमरसारखे विस्मृतीसंबंधित रोग दूर ठेवायला ओरिगामीची मदत होते.

ओरिगामीचे फायदे | Benefits of Origamy

ओरिगामी वर उल्लेख केल्या प्रमाणे पेपर फोल्डिंगची पारंपारिक जपानी कला आहे, पेपर फोल्डिंगची ही कला विविध प्रकारचे फायदे देते. ओरिगामीमध्ये गुंतल्याने मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक पैलूंवर सकारात्मक परिणाम होतात. ओरिगामीची कला जोपासण्याचे काही फायदे येथे आहेत:

ओरिगामीमुळे तणाव कमी होतो | Origami reduces stress:

ओरिगामी मुळे मन शांत रहाते, तणावापासून मुक्ती मिळते. मेडिटेशन सारखे फायदेही मिळतात. कागदाच्या घड्या घालून विशिष्ट गुंतागुंतीची रचना तयार केल्यामुळे टेन्शन कमी होण्यास मदत होते.

ओरिगामीमुळे सुधारित एकाग्रता येते । Origami improves concentration:

ओरिगामीमध्ये कागद फोल्ड करण्याच्या प्रक्रियेसाठी एकाग्रता वाढते आणि दिलेला आकार तयार करण्यावर लक्ष केंद्रित करता येते. ओरिगामीमध्ये गुंतल्याने तुमची लक्ष केंद्रित करण्याची आणि विशिष्ट असा आकार तयार करण्याची क्षमता वाढू शकते.

ओरिगामीमुळे वाढलेला संयम | Increased Patience Due to Origami:

ओरिगामीमध्ये बर्‍याचदा क्लिष्ट फोल्डिंग सीक्वेन्स असतात त्यासाठी संयम आवश्यक असतो. फोल्डिंग प्रक्रियेचे पुनरावृत्ती होणारे स्वरूप संयम आणि चिकाटी विकसित करण्यास मदत करते.

ओरिगामीमुळे सर्जनशील अभिव्यक्ती निर्माण होते | Creative Expression Through Origami :

ओरिगामी म्हणजे केवळ दिलेलाच आकार तयार करणे नसून आपल्या मनात विशीत आकार विचारात घेऊनही वेगळे असे आहार आणि कलाकृती बनविता येतात. म्हणजेच ओरिगामी कागदाच्या चौकोनी तुकड्याच्या मर्यादेत सर्जनशील अभिव्यक्तीसाठी परवानगी देते. अद्वितीय वेगळी अशी ओरिगामी मॉडेल्स तयार करण्यासाठी कलाकार वेगवेगळ्या पट, आकार आणि डिझाइनसह प्रयोग करू शकतात.

ओरिगामीचे विद्यार्थ्यांसाठी संज्ञानात्मक फायदे | Cognitive Benefits for students :

शाळेत शैक्षणिक कार्यक्रमात ओरिगामीचा उपयोग भूमिती, सममिती आणि अवकाशीय तर्क (geometry, symmetry and spatial reasoning) शिकवण्यासाठी केला जातो. यामुळे मुलांमध्ये संज्ञानात्मक कौशल्ये आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.

ओरिगामीमुले सजगता आणि विश्रांती | Mindfulness and relaxation through origami:

ओरिगामीमध्ये गुंतणे आणि कलाकृती निर्माण करणे हा एक प्रकारचा माइंडफुलनेस असू शकतो, जिथे व्यक्ती सध्याच्या क्षणावर आणि कागदाच्या फोल्डिंगच्या स्पर्शाच्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करतात. यामुळे विश्रांती आणि सर्वांचे कल्याण होवो ही भावना मुलांमध्ये वाढते.

ओरिगामी एक इको-फ्रेंडली क्राफ्ट | Origami An Eco-Friendly Craft:

- ओरिगामीला साहित्य लागते. ओरिगामीला सामान्यत: फक्त कागदाची आवश्यकता असते, ज्यामुळे ते पर्यावरणास अनुकूल बनते. कमीतकमी सामग्री वापरली जात असल्यामुळे जास्त कचरा निर्माण न करता कलाकृती निर्माण करता येते.

सर्व वयोगटातील लोकांसाठी ओरिगामी | Origami for people of all ages:

- ओरिगामी हा एक बहुमुखी कला प्रकार आहे ज्यासाठी महागड्या साहित्याची आवश्यकता नसते. तसेच सर्व वयोगटातील आणि कौशल्य स्तरावरील लोकांना ओरिगामी शिकता येते.

ओरिगामी स्मरणशक्ती सुधारणे:Origami Improves Memory

- ओरिगामी फोल्डिंग सिक्वेन्स शिकणे आणि लक्षात ठेवणे यामुळे स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो.

 निष्कर्ष ( Conclusion)-

सद्याच्या काळात ओरिगामी शिकणं खूप सोपं झालंय. भरपूर पुस्तकं आणि इंटरनेटवर असंख्य संकेतस्थळं आहेत. त्याद्वारे सर्वजण घरच्याघरी ओरिगामी सहज शिकू शकतात. ओरिगामीने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. ओरिगामी म्हणजे केवळ कलात्मकता नसून ते एक ध्यान आणि शैक्षणिक क्रियाकलाप देखील आहे.  ओरिगामी भूमिती आणि अभियांत्रिकीची तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात वापरली जातात. याव्यतिरिक्त, ओरिगामीचे उपचारात्मक फायदे देखील आहेत.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे

सर्वांसाठी बहुउपयोगी ओरिगामी | Multipurpose origami for all सर्वांसाठी बहुउपयोगी ओरिगामी |  Multipurpose origami for all Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जून ३०, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.