वर वधूंंच्या वेंधळेपणावर पर्याय | options on confusion of groom bride

Marriage-Barat
Marriage-Barat

वर वधूंंच्या वेंधळेपणावर नवीन पर्याय

New options on the confusion of groom bride

खरेतर अनेक लोकांच्या साक्षीने विवाह निश्‍चित होतात आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत साजरे होतात. तरीही वरवधूंंच्या या वेंधळेेपणाकडे आतापर्यंत कुणाचेच का लक्ष गेले नाही, याचे आश्‍चर्य वाटते. कोणता हा वेंधळेेपणा?

विवाहाच्या बाबतीत अनेक चालीरीती आणि रूढी परंपरा प्रचलित आहेत. एकमात्र सर्वमान्य बाब म्हणजे नवरदेवाने वरात आणली पाहिजे आणि वरातील बॅण्ड सुद्धा नवरदेवामार्फत हवा. पण अनेक विवाह समारंभामध्ये नवरदेवाची वरात आणि त्यासोबत असलेला बॅण्डने वाजविलेल्या गाण्यांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते, कसे? ते खालील उदाहरणांवरून स्पष्ट होईल.

In many wedding ceremonies, Navradeva's wedding and the songs played by the accompanying band create confusion, how? That will be clear from the following examples.

मै हू डॉन | Main hu don

कोणत्याही नवरदेवाचे नाव डॉन नाही. तरीही तो वरातीत- एक हिंदी गाणे वाजवितो आणि अरे दिवानो, मुझे पहचानो, मै हू डॉन-मै हू डॉन असे ओरडून ओरडून खोटे सांगतो आणि त्याच्या अवती-भोवती असलेले शेकडो लोक या खोटेपणाला समर्थन देतात. यामुळे वधुकडील मंडळी गोंधळात पडतात. विवाह ठरला तेव्हा वराचे नाव राहूल होते आणि आता नवदेव मै हू डॉन मै हू डॉन असे का म्हणत आहे? खरे तर त्याने मै हू राहूल मै हू राहूल असे गाणे गायला हवे.

सात समंदर पार मै | Sat samundar par mai tere piche

नवरदेव म्हटला म्हणजे पुरूष व्यक्ती. तरीही तो वरातीत विवाह मंडपात पोहचतेवेळी -सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आ गयी असे गाणे लावतो, असे का? या गाण्यामुळे पाहुणे मंडळी गोंधळात पडतात. वरात नवरदेवाची आहे तर त्याने पिछे पिछे आ गया असे म्हटले पाहिजे, पिछे पिछे आ गयी असे म्हणणे चुकीचे आहे.

शांताबाई शांताबाई | Shantabai Shantabai

नवरदेवाच्या नियोजित वधूचे नाव वेगळेच असते आणि तेच नाव घेत त्याने विवाह मंडपात यायला हवे, जसे की वधुचे नाव रजनी असल्यास वराने रजनीबाई रजनीबाई असे म्हणत विवाह मंडपात प्रवेश केला पाहिजे. परंतु तो शांताबाई शांताबाई असे गाणे डीजेवर वाजवत हजर होतो. त्यामुळे वधू संताप करते, तिला वाटते की लग्न लावायच्या आतच हा नाव विसरला.

कोंबडी पळाली | Kombadi palali

विवाह हा अतिशय महत्त्वाचा क्षण. यावरच लक्ष केंद्रीत हवे. पण नवरदेव मात्र कुणाची तरी कोंबडी पळून जाते, त्याचे दु:ख म्हणून गाणे लावतो आणि कोंबडी पळाली तंगडी धरूनी... हे गाणे म्हणत मंडपाकडे येतो. विवाह प्रसंगी कुणाच्या तरी कोंबडीचे टेन्शन घेणे म्हणचे निर्बुद्धपणाच म्हणायला हवा.

सोनू तुझा माझ्यावर... | Sonu tuza mazyavar bharvasa

मै हू डॉन..., सात समंदर पार... शांताबाई...... आणि कोंबडी पळाली... अशा वर स्पष्ट केलेल्या बाबींवर नियोजित वधूने आक्षेप घेतला तर नवरदेवाकडील बॅण्ड गाणे लावतो-सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही का? म्हणजे येथेही तो खोटे बोलतो, कारण या केसमध्ये वधूचे नाव सोनू नाही, रजनी आहे. त्याने रजनी तुझा माझ्यावर भरवसा नाही का? असे म्हटले पाहिजे.
 
वरील सर्व उदाहरणांमुळे नियोजित वराबद्दल त्या वधूला अविश्‍वास वाटू लागतो.

विवाह ठरतेवेळी नाव राहूल होते, आता हा डॉन म्हणतो, सात समंदर पार मैं पिछे पिछे आ गया च्या ऐवजी पिछे पिछ आ गयी म्हणतो, रजनीबाई रजनीबाई असे म्हणण्याऐवजी शांताबाई शांताबाई असे म्हणतो, विवाह प्रसंगी कोणच्या तरी कोंबडीचे टेन्शन घेतो आणि यावर स्पष्टीकरण देतांना रजनी तुझा माझ्यावर भरवसा नाही का? असे म्हणण्याऐवजी सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही का? असे गाणे लावतो. अशा अविश्‍वसनीय घटनांमुळे लग्न लागायच्या अगोदरच मोठा वाद निर्माण होउ शकतो. 

पण हा वाद येथेच थांबी नाही, वधूच्या वरील सर्व आक्षेपांना उत्तर म्हणून नवरदेवदेखील एक त्रुटी शोधून काढतो,

बहारो फुल बरसावो... | Baharo phool barsao

टिना, मीना, पिंकी, चिंगी आदी मुलींना वराच्या स्वागतासाठी नियोजित केलेले असते. याची कल्पना सर्वांना दिलेली असते. तरी सुद्धा विवाह मंडपात प्रवेश करतेवेळी गाणे वाजते-बहारो फुल बरसावो मेरा मेहबूब आया है... खरे तर वधूकडील मंडळींनी टिना, मीना, पिंकी, चिंगी फुल बरसावो मेरा मेहबूब आया है असे गाणे वधूमार्फत वाजविले पाहिजे. आक्षेप येथेच थांबत नाही, नवरदेव म्हणतो हा मेहबूब कोण? सुधारित गाणे असे असावे-टिना, मीना, पिंकी, चिंगी फुल बरसावो मेरा राहूल आया है...

    अशा प्रकारे एकमेकांच्या त्रुटी काढत वाद सुरूच राहतो. वर आणि वधूकडील मंडळीही याला हातभार लावतात. पण यावर आता उपाय सापडला आहे, तो म्हणजे आधार कार्ड. यापुढे असे अविश्‍वासाचे संकट निर्माण झाल्यास विवाह मंडपात प्रवेश करतेवेळी संबंधित वराचे आधारकार्ड तपासावे. त्यात त्याचे खरे नाव, स्त्री-पुरूष, जन्म तारीख अशा सर्व बाबींचा उल्लेख असतो. तसेच सध्याच्या डिजीटल जमान्यात साऊण्ड एडिटींग अतिशय सापे झाले आहे. मै हू डॉन असे गाणे लावण्याऐवजी हे गाणे मै हू राहूल असे एडीट करून वाजविणे अवघड नाही. यामुळे विवाहातील वर वधूंची नावे विचारात घेऊन गाणे एडीट करण्याचा एक नवीन व्यवसाय निर्माण होऊ शकतो.

    केवळ विनोद निर्मितीसाठी वरील किस्सा आहे. सर्वांनी धुमधडाक्यात आपापले खिसे सांभाळून विवाह उत्सव साजरे करावेत. लोकांना आनंद मिळेल अशी गाणी सर्वांना आवडेल इतक्याच आवाजात वाजवावीत. विवाह मंडपात प्रवेश करतेवेळी आधार कार्ड तपासण्याची सरकारची कुठलिही योजना नाही. तसेच गाणे एडीट करतांना कॉपीराईट किंवा इतर प्रकारे कुणी आक्षेप घेईल का याबाबत कायदेशीर बाबी तपासाव्यात.


- योगेश रमाकांत भोलाणे
Mob- 9881307618
bholaneyogesh18@gmail.com
++++++++++++++++++++
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने