पीकवाढीसाठी मधमाशापालन आवश्यक | Beekeeping is essential for crop growth

Beekeeping is essential for crop growth
beekeeping for crop growth

पीकवाढीसाठी मधमाशापालन आवश्यक 

Beekeeping is essential for crop growth

बरीच पिके परागीभवनासाठी मधमाश्यासारख्या कीटकांवर अवलंबून असतात. अशी पिके फुलात आल्यावर जर मधमाश्यांसारखे कीटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतील तर उत्तम बियाणे, वेळेवर खतपाणी आणि पीक संरक्षण करून सुद्धा अपेक्षित पीक उत्पादन मिळणार नाही. परंतु शेतीसाठी, पिकांच्या फळधारणेसाठी मुद्दामच मधमाशा पाळायच्या कशा, यावर संशोधन किंवा शिफारसी उपलब्ध नाहीत. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • भारतातील मधमाश्यांबद्दल नवीनतम आकडेवारी
  • परागीभवन आणि पीक उत्पादन
  • मधमाश्यांचे आस्तित्त्व आता धोक्यात
  • मधमाशांनी परागीभवन थांबवले तर
  • निष्कर्ष

मधमाश्या त्यांच्या खाद्यासाठी फुलणाऱ्या वनस्पतीवर संपूर्णपणे अवलंबुन असतात आणि ७० टक्के फुलणाऱ्या वनस्पती परागसिंचनासाठी म्हणजे बीज फल धारणेसाठी मधमाश्यांवर अवलंबून असतात. फुलणाऱ्या वनस्पती आणि मधमाश्या यांचे परस्परावलंबित्व गेली करोडो वर्ष सुरू आहे. एकाचे अभावी दुसऱ्याचे आस्तित्वच अशक्य आहे. काळाच्या ओघात पिके बदलली, शेतीच्या पद्धती बदलल्या पंरतु मधमाश्यांना पर्याय अजुनही सापडलेला नाही. अवेळी पाऊस, बी आणि खतांची वेळेवर न होणारी उपलब्धता, वैश्विक तापमान वृद्धी अशा अनेक सकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर आता मधमाश्यांची कमी होणारी संख्या हे सकंटही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतातील मधमाश्यांबद्दल नवीनतम आकडेवारी | latest Statistics about bees in India

    परागणात मधमाश्या महत्त्वाची भूमिका बजावतात, जी अनेक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असते. भारतात, देशभरातील 50 दशलक्ष हेक्टरमधील पिके मधमाश्यांच्या परागणावर अवलंबून असतात. मधमाश्या कमी झाल्यामुळे कृषी क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होऊ शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एपिस मेलिफेरा ही युरोपियन आयात भारतातील मधमाशी 75% मधाचे उत्पादन करते. 
       भारत हा जगातील प्रमुख मध निर्यात करणार्‍या देशांपैकी एक आहे आणि भारताने 2021-22 मध्ये 74,413 मेट्रिक टन मधाची निर्यात केली आहे.. सध्या, सुमारे 12,699 मधमाशीपालक आणि 19.34 लाख मधमाशांच्या वसाहती राष्ट्रीय मधमाशी मंडळाकडे नोंदणीकृत आहेत आणि भारत सुमारे 1,33,200 मेट्रिक टन मधाचे उत्पादन करत आहे. भारतातील 50% पेक्षा जास्त मध उत्पादन इतर देशांमध्ये निर्यात केले जाते. भारत सुमारे 83 देशांमध्ये मध निर्यात करतो. भारतीय मधाची प्रमुख बाजारपेठ यूएसए, सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, कॅनडा इत्यादी आहेत. मोहरीचा मध, निलगिरीचा मध, लीची मध, सूर्यफूल मध, पोंगमिया मध, बहु-वनस्पती हिमालयीन मध, बाभूळ मध आणि वन्य वनस्पती मध हे मधाचे काही प्रमुख प्रकार  भारतातून निर्यात केल्या जातात. 
    भारतातून निर्यात केलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर भारताचे निर्यात निरीक्षण परिषद (EIC) कायद्यांतर्गत वाणिज्य विभाग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत सरकारद्वारे परीक्षण केले जाते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत वाणिज्य विभागाने अन्न व्यापार, आयात आणि निर्यातीसाठी व्यापार धोरण तयार केले. APEDA मधासह कृषी अन्न उत्पादनांच्या निर्यातदारांना विविध प्रोत्साहने आणि आर्थिक सहाय्य देते.
 कृषी आणि FW मंत्रालयाने मध आणि इतर मधमाशांच्या उत्पादनांच्या ट्रेसिबिलिटी रेकॉर्ड ठेवण्यासाठी एक ऑनलाइन पोर्टल म्हणजे "मधुक्रांती पोर्टल" विकसित केले आहे.

परागीभवन आणि पीक उत्पादन | Pollination and crop production 

शेती पिकांपैकी काही पिके परागीभवनासाठी कीटकांवर अवलंबून नसतात, परंतु गळीताची धान्ये, चाऱ्याची पिके, मसाल्याची पिके, फळभाज्या, फळपिके अशी बरीच पिके परागीभवनासाठी मधमाश्यासारख्या कीटकांवर अवलंबून असतात, अशी काही पिके स्वपरागसिंचित वांझ आणि परपरागसिंचित सफल असतात. मधमाश्यांच्या फुलांतील मकरंद व पराग गोळा करण्याच्या प्रक्रियेत एका फुलातील पूबीज आणि दुसऱ्या फुलांतील स्त्रीबीज यांचे मिलन होऊन बीज-फलधारणा होते आणि बियाण्याची प्रतही सुधारते. 

            बऱ्याच पिकांमध्ये पिके फुलात आल्यावर जर मधमाश्यांसारखे कीटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतील तर उत्तम बियाणे, वेळेवर खतपाणी आणि पीक संरक्षण करून सुद्धा अपेक्षित पीक उत्पादन मिळणार नाही. मधमाश्या एकदा एका पिकांच्या फुलोऱ्यावरून मकरंद-पराग गोळा करू लागल्या की त्या पिकाचा फुलोरा संपेपर्यंत एकनिष्ठेने त्याच फुलोऱ्याचा मकरंद-पराग गोळा करतात. या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यामुळे इतर कुठल्याही कीटकांपेक्षा मधमाश्या जास्त कार्यक्षम आणि भरवश्याच्या परागसिंचक समजल्या जातात. 

        तेलबियापिके जसे सोयाबीन, तीळ, कारळा, जवस, सूर्यफुल, करडई, विविध कडधान्ये जसे- तूर, मुग ,उडीद, मटकी, फळपिके जसे सफरचंद ,संत्री, मोसंबी ,लिंबू, कलिंगड, डाळींब, पेरू, फळभाज्या-मिरची, काकडी, भोपळे ,वांगी, भेंडी, पडवळ, कारली आणि चारा पिके जसे लसूण घास, बरसीम या सर्व पिकांमध्ये मधमाश्यांमुळे परपरागीभवन होऊन पिकांच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होते. 

मधमाश्यांचे आस्तित्त्व आता धोक्यात | The existence of bees is now in danger

शेतीसाठी अतिशय उपयुक्त अशा या मधमाश्यांचे आस्तित्त्व आता धोक्यात आले आहे, मधमाश्यांची घटत चाललेली संख्या हा मोठा चितेंचा विषय पूर्ण जगाला सतावू लागला आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये पूर्ण जगात मधमाश्यांच्या वसाहती मोठ्या प्रमाणावर कमी होत आहेत. युरोप मधील इग्लंडमध्ये गेल्या वीस वर्षात मधमाश्यांची संख्या घटून आता फक्त ५० टक्केच मधमाश्यांच्या वसाहती शिल्लक आहेत. जगात सर्वात जास्त मधमाश्यांच्या घटीचे प्रमाण इग्लंडमध्ये दिसून येत आहे.
मधमाश्यांच्या संख्येत घट होण्यामागे प्रमुख तीन कारणे शास्त्रज्ञांनी विचारात घेतली आहेत. ती म्हणजे त्यांना मिळणाऱ्या चांगल्या प्रतीच्या पोषक आहाराचा अभाव, कीडनाशकांचा वापर आणि परजीवींचा झालेला संसर्ग. जगात बऱ्याच ठिकाणी एकच पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, त्यामुळे या एकाच पिकातून पराग व मकरंद हे मधमाश्यांचे अन्नपदार्थ गोळा केले जातात, त्यामुळे सर्व प्रकारची जीवनसत्त्वे या एकाच पिकातून मधमाश्यांना उपलब्ध होत नाहीत आणि अशातऱ्हेने पुरेशी अन्नद्रव्ये मधमाश्यांना प्राप्त होत नाहीत. तसेच पराग व मकरंद (पुष्परस, मधुरस) हे अन्नपदार्थ फुलांतून जमा करून पोळ्यामध्ये नेतांना ह्यामधुन कीडनाशकांचे अंश पोळ्यात पोहचतात आणि त्याचा अयोग्य परिणाम त्या वसाहतींवर होतो. 

मधमाशांनी परागीभवन थांबवले तर | If bees stop pollinating

जर मधमाशांनी परागीभवन थांबवले तर त्याचे दूरगामी आणि परिसंस्था, शेती आणि जागतिक अन्न पुरवठ्यावर गंभीर परिणाम होतील. मधमाश्या, परागीभवन करणाऱ्या इतर घटकांसह फळे, भाज्या आणि नट तयार करणाऱ्यांसह अनेक फुलांच्या वनस्पतींचे परागीभवन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जर मधमाश्यांनी परागीभवन थांबवले तर त्याचे परिणाम पर्यावरण, शेती आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतील. मधमाशांनी परागकण थांबवल्यास काही परिणाम खालील प्रमाणे :

  • अन्न पुरवठ्यावर परिणाम:  मानव आणि इतर प्राणी ज्या पिकांवर पोषणासाठी विसंबून असतात त्या पिकांच्या उत्पादनासाठी परागीभवन (pollination)  आवश्यक असते. मधमाश्यांनी परागीभवन थांबवले तर  पुरेसा अन्न साथ निर्माण होऊ शकणार नाही. 
  • शेती पिकांचे नुकसान:  अनेक पिके पुनरुत्पादनासाठी परागणावर अवलंबून असतात आणि मधमाश्या विविध फळे, भाज्या, शेंगदाणे आणि तेलबियांसाठी आवश्यक परागीभवन करतात. मधमाश्या कमी झाल्यास परागीभवन कमी होईल आणि त्यामुळे पीक उत्पादनात घट होऊ शकते आणि काही प्रकरणांमध्ये पीक अपयशी ठरू शकते. त्यामुळे पोषक समृध्द अन्नाची उपलब्धता कमी होऊन जागतिक पोषणावर परिणाम होऊ शकतो.
  • जैवविविधतेत घट: पुष्कळ फुलांची झाडे पुनरुत्पादनासाठी परागकणांवर अवलंबून असतात. मधमाश्या अनुपस्थित असल्‍यास, या झाडांना बियाणे तयार करण्‍यासाठी संघर्ष करावा लागेल, ज्यामुळे वनस्पतींची संख्या कमी होईल आणि अन्न आणि निवासासाठी या वनस्पतींवर अवलंबून असलेल्या प्राण्यांवर परिणाम होईल.
  • प्राण्यांच्या प्रजातींवर होणारा परिणाम: पक्षी, कीटक आणि सस्तन प्राण्यांसह अनेक प्राणी उदरनिर्वाहासाठी फुलांच्या वनस्पतींद्वारे उत्पादित फळे आणि बियांवर अवलंबून असतात. परागणाच्या कमतरतेमुळे वनस्पतींच्या संख्येतील घट या प्राण्यांच्या प्रजातींवर परिणाम करेल.
  • औषधी वनस्पतींचे नुकसान: अनेक औषधी वनस्पती पुनरुत्पादनासाठी परागणावर अवलंबून असतात. परागकणांमध्ये घट झाल्यामुळे या वनस्पतींच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो, पारंपारिक आणि आधुनिक औषध पद्धतींवर परिणाम होऊ शकतो.
  • मधाची कमी उपलब्धता: मध उत्पादनात मधमाश्या मध्यवर्ती भूमिका बजावतात. मधमाश्यांच्या लोकसंख्येमध्ये घट झाल्यामुळे केवळ मधाच्या उपलब्धतेवरच परिणाम होणार नाही तर मधमाशीपालन आणि त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होईल.

निष्कर्ष ( Conclusion)-

काही देशांमधील प्रमुख पिकांवर मधमाश्यांच्या घटलेल्या संख्येमुळे परागीभवनाचे प्रमाण ५० टक्के पर्यंत कमी झाले आहे. ही एक धोक्याची सूचना मानली जात आहे, मधमाश्यांच्या संख्यावाढीसाठी आताच ठोस पावले उचलण्याची वेळ संपूर्ण जगावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत मधमाश्या शेतीला उपयोगी कशा आहेत, यावरच संशोधन झाले आहे, परंतु शेतीसाठी, पिकांच्या फळधारणेसाठी मुद्दामच मधमाशा पाळायच्या कशा, यावर संशोधन किंवा शिफारसी देण्यात आलेल्या नाहीत. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर ज्या प्रमाणे संशोधन होत आहे, त्याच प्रमाणे मधमाश्यांच्या कार्यावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे.

- योगेश भोलाणे,
Photo used in this article is modified and original source of photo is :- Photo by Ray Bilcliff from Pexels

---------------------------------
हे सुद्धा वाचा-
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने