पृथ्वीवरील चमत्कार- लसूण | The miracle of the Earth- Garlic

The miracle of the Earth- Garlic

पृथ्वीवरील चमत्कार- लसूण

लसणास ((Allium sativum) बरीच स्थानिक नावे आहेत. उदा.लसूण(मराठी), लेहसण (हिंदी), लासान (पंजाबी), महासुडा (संस्कृत). लसणामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळेच लसणाला पृथ्वीवरील चमत्कार असे म्हटले जाते. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • लसूण-औषधी गुणधर्म
  • लसूण लागवड
  • निष्कर्ष

लसूण-औषधी गुणधर्म | Garlic-medicinal properties

  • लसणामुळे आतड्यातील कृमींचा बंदोबस्त होतो. हगवण व अतिसाराच्या ( Diarrohea) जंतूची वाढ लसणाच्या रसामुळे थांबते. लसणात बुरशी व कृमीनाशक तत्त्व (Fungi and anthelmintics) आहेत. त्यामुळे जखमा बर्‍या होण्यास मदत होते व कुजलेल्या अल्सरवरदेखील लसूण गुणकारी आहे.
  • लसूण त्याच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायद्यांसाठी ओळखले जाते. लसणाच्या सेवनाने  रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची क्षजमता कमी होते.  त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास आणि  कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
  •  लसणाच्या नियमीत सेवनामुळे रक्त पातळ ( blood thinner) ठेवण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढते आणि रक्तातील कोलेस्टरॉलचे ( cholesterol)  प्रमाण कमी होते. ह्दयास उत्तेजना देऊन सूज कमी करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम लसूण करतो. लसणामध्ये ऍलिल सल्फाइड  ( alyl salphide) असते, ते फायटो टोकेमिकल म्हणून कार्य करते. ते रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते. त्यामुळे रक्तात गुठळ्या निर्माण होत नाहीत. तसेच लसणामुळे रक्तवाहिन्या रूंद होतात, त्यामुळे अंजायना ( Angina) टळू शकतो.
  • याचा उपयोग कॅन्सरच्या गाठींवर उपाययोजनांसाठीसुद्धा केला जातो. लसणाच्या सेवनामुळे कर्करोगांपासून ( cancer)  माणसाला संरक्षणकवच देण्याची विशिष्ट शक्ती मिळते. कारण स्तन, प्रोस्टेट आणि आतडे यांचे कर्करोग (Breast, prostate and bowel cancer)  होण्याची संभावना लसणाच्या नियमीत सेवनाने कमी होते. मधुमेहातही लसूण गुणकारी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण काही अंशी नियमित होण्यास मदत होते आणि इन्शुलिनच्या निर्मितीलाही चालना मिळते.
  • लसणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक पेशींची क्रिया वाढते. लसणाचे नियमित सेवन केल्याने शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळू शकते.
  • शरीरावरील अनावश्यक मेद ( fat) कमी करण्यासही लसूण उपयुक्त ठरतो. तसेच लसणाच्या तेलाचा उपयोग अर्धांगवात ( paralysis)  व संधिवात ( Arthritis ) या रोगांवर होतो.
  • पक्षघात आणि दम्याच्या विकारांवर (On paralysis and asthma disorders) देखील लसणाच्या तेलाचा उपयोग गुणकारी आहे. मृच्छा आल्यावर कांद्याप्रमाणेच तेलाचा उपयोग करता येतो.
  • तसेच कानदुखीवर ( ear pain ) लसणाच्या वाळलेल्या पाकळ्या तिळाच्या तेलात घालून ते तेल वापरतात.
  • लसूण विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करून शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेस समर्थन देऊ शकते. हे विशिष्ट एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित करते जे डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात.
  • लसणाच्या सेवनाने बुद्धी, स्मृती व नेत्रबल वाढते. लसूण उष्ण, उत्तेजक असून खोकला, न्युमोनिया, ब्रॉकायटीस (Cough, pneumonia, bronchitis ) व अन्य रोगांवर गुणकारी आहे. 
  • अकाली केस पांढरे होत असल्यास असे केस काळे करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या राईचे तेल आणि मध यांच्या मिश्रणात टाकून तेलांना मालिश करतात.
  • कांद्यापेक्षा लसणात पोषक द्रव्यांचे प्रमाण जास्त असते. लसणामध्ये प्रथिने,( proteins)  कर्बोदके ( carbohydrates)  तसेच स्फुरद. पालाश, चुना आणि मॅग्नेशीयम इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. स्निग्ध पदार्थ (fats)  आणि क जीवनसत्त्वाचे ( vitamin C ) आणि गंधकाचे प्रमाणही लसणात भरपूर असते.
  • फ्री रॅडिकल्स हे रेणू वृद्धत्व आणि विविध रोगांना कारणीभूत ठरू शकतात. लसणामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सला अप्रभावी  करण्यास मदत करतात. 
  • शिवाय लसणातील हायड्रोजन सल्फाइड ( Sulfide) हा ऍण्टीऑक्सिडंट आहे. हायड्रोजन सल्फाइड मुळे पेशींमधील संदेशवहन सुलभ होते. रक्तप्रवाह विनाप्रयासपणे प्रवास करत राहिल्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. लसणातील दर्प हा अल्लीसीन व त्यापासून मिळणारे डाय अलील डाय सल्फाईड ( Di allyl disulfide )या रसायनामुळे होतो. रोजच्या भाज्या व चटणी व्यतिरीक्त लसणाचा टोमॅटो केचप, लोणची , पापड इत्यादी पदार्थात उपयोग होतो. आता लसणाची पावडर किंवा निर्जलीकरण केलेल्या लसणांच्या पाकळ्ंयाचा वापर करण्यास लोकांचा कल वाढत आहे.
  • लसणामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विषाणूविरोधी गुणधर्म आहेत, जे श्वसन संक्रमण आणि सामान्य सर्दीसह संक्रमणांशी लढण्यास मदत करू शकतात.
  • तसेच लसणात जंतुनाशक आणि किटकनाशक गुणधर्म आहेत.पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठी काही ठिकाणी जेैविक किटकनाशक (Organic pesticides)  बनवितांना लसणाचा उपयोग करतात. वाफ्याच्या वरंब्यावर लसूण लावल्यास वाफ्यातील रोपांचे किडीपासून संरक्षण होते.

लसूण लागवड  | Planting garlic

आपल्या भागात लसणाची पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये केली जाते. गोदावरी, श्‍वेता, यमुना सफेद, ऍग्रीफाऊंडव्हाईट, फुले बसवंत या जातींची प्रामुख्याने लागवड केली जाते. लसणाच्या पेरणीसाठी सुमारे ६ क्विंटल बियाण्यांचे प्रमाण लागत असून योग्य व्यवस्थानामुळे ९ ते १० टन प्रति हेक्टरी लसणाचे उत्पन्न मिळू शकते.

निष्कर्ष ( Conclusion)-

सदर लेखातून आपल्या लक्षात आले असेलच की लसूण  हा केवळ एक लोकप्रिय मसाल्याचा पदार्थ नाही तर त्याच्या विविध आरोग्य फायद्यांसाठी देखील ओळखला जातो. परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की लसणाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही व्यक्तींवर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लसणाचा औषध म्हणून वापर करावा. औषधे घेत असलेल्या किंवा विशिष्ट आरोग्य स्थिती असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणात लसूण किंवा लसूण पूरक पदार्थ समाविष्ट करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यावसायिकांशी सल्लामसलत करावी.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

पृथ्वीवरील चमत्कार- लसूण | The miracle of the Earth- Garlic पृथ्वीवरील चमत्कार- लसूण | The miracle of the Earth- Garlic Reviewed by Yogesh Ramakant Bholane on डिसेंबर १०, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.