विषमुक्त शेतमालासाठी | For toxin-free agriculture

Toxin free agriculture produce
Toxin free agriculture produce

विषमुक्त शेतमालासाठी

प्रमाणाच्या बाहेर कीटकनाशकांच्या फवारण्यांमुळे शेतमाल विषारी बनला आहे.  जेव्हा माणसांवर त्यांच्या आहारातून ह्या विषप्राशनाची पाळी आली तेव्हा कुठे कीटकनाशकाच्या अयोग्य वापरांवर चर्चा होऊ लागली. विषमुक्त शेतीला चालना देण्यासाठी, अनेक शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. या पद्धतींचा उद्देश कृत्रिम रसायनांचा वापर कमी करणे, पर्यावरणावरील प्रभाव कमी करणे आणि दीर्घकालीन मातीच्या आरोग्यास प्रोत्साहन देणे आहे. विषमुक्त शेतीसाठी खालील प्रकारे काही धोरणेआखता येऊ शकतात. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण
  • कमाल अवशेष मर्यादा
  • कीटकनाशकांचे मर्यापलिकडे अवशेष
  • शेतमाल विषमुक्त करण्यासाठी उपाय
  • विषमुक्त पिके का आवश्यक आहेत?
  • निष्कर्ष

कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण | Amount of pesticide residues

कोणतीही रासायनिक औषधे मग ती कीटकनाशके ( pesticides ) असोत किंवा बुरशीनाशके ( fungicides ) अथवा तणनाशके ( herbicides ) असोत, ती सर्व वीषारी आहेत. हे आजच्या वैज्ञानिक युगातील सर्व शेतकर्‍यांना माहीत आहे. तरीसुद्धा हे विष प्रमाणाच्या बाहेर देऊन पिकांवर आणि भूमातेवर भयानक अत्याचार केला जात आहे. अनेक वर्षांपासून हा अत्याचार सुरू आहे, परंतु जेव्हा माणसांवर त्यांच्या आहारातून ह्या विषप्राशनाची पाळी आली तेव्हा कुठे कीटकनाशकाच्या अयोग्य वापरांवर चर्चा होऊ लागली. परंतु आपल्या रोजच्या अन्नात कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण दरवर्षी वाढत असूनसुद्धा पिकांवरील कीटकनाशकांचा वापर कुठेही कमी झालेला नाही.

कमाल अवशेष मर्यादा  |  Maximum residue limit

फळे आणि भाजीपाला पिकांवर कीटकनाशकांच्या अनेक फवारण्या केल्या जातात. त्यामुळे कीटकनाशकांचे विषारी अवशेष कमी अधिक प्रमाणात पीक काढणीच्या वेळी पिकांवर शिल्लक राहतात. या विषारी अवशेषांचे दुष्परिणाम त्वरीत दिसून येत नसले तरी दिर्घकाळानंतर त्यापासून विविध आजार होण्याचा धोका संभवतो. कारण अशी वीषयुक्त अन्नधान्य आपल्या आहारात स्लो पॉयझन सारखे कार्य करतात. त्यामुळे अन्नघटकातील कीटकनाशकांचे प्रमाण किती मर्यादेपयेॅत असावेत, याविषयी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयपातळीवर अन्न गुणवत्ता विषयक मापदंड निश्‍चित करण्यात आलेले आहेत. या मापदंडानुसार प्रत्येक कीटकनाशकांच्या अवशेषांची विविध पिकांवरील उच्चतम पातळी निश्‍चित करण्यात येते, त्यास कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) म्हणतात. या कमाल अवशेष मर्यादांच्या आधारे प्रत्येक कीटकनाशकाचा वापर केल्यानंतर फवारणी ते काढणीपर्यंतचा सुरक्षित कालावधी म्हणजे काढणीपूर्व प्रतिक्षा कालावधी ठरवण्यात येतो. सर्वसाधारणपणे काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी उलटल्यानंतर पिकांची काढणी केल्यास कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा कमी राहतात.

कीटकनाशकांचे मर्यापलिकडे अवशेष | Pesticide residues beyond limits

कीटकनाशकांचे मर्यापलिकडे अवशेष असलेल्या आणि हानिकारक कीटकनाशके फवारलेल्या भाज्या आता स्थानिक बाजारपेठेत सर्रास विक्री होत असतांना दिसत आहेत. याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नमुन्यांच्या परीक्षणानंतर संबधित कीटकनाशक उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अलिकडेच सांगितले. तसेच बंदी घातलेल्या ६७ कीटकनाशकांची देशात विक्री होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. अनेकदा परवानगी घेतांना कीटकनाशकांचे उत्पादक सरकारला कायद्यानुसार योग्य अशी माहिती देतात आणि उत्पादन करतेवळी शास्त्रीय निकष धाब्यावर बसवितात. त्या अनुषंगाने सरकारने एक योजना आखून देशभरातील फळे व भाज्यांचा नमुन्यांची काटेकोर तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. बंदी घातलेले आणि नियम न पाळता कीटकनाशके उत्पादन करणार्‍यांचे परवाना निलंबित करणे, खटले भरणे, दंड करणे अशाप्रकारची सरकार आता कारवाई करणार आहे.

सरकार तर शासकीय धोरणानुसार संबधितांवर कारवाई करेलच, परंतु शेतकरी सुद्धा लोकांच्या सुरक्षितेसाठी काही उपाय योजना करून शेतमाल विषमुक्त करू शकतात, त्यात-

शेतमाल विषमुक्त करण्यासाठी उपाय | Measures to detoxify agricultural products

  • शेतकर्‍यांनी रासायनिक कीटकनाशकांची आवश्यकता असेलतरच आणि अत्यंत माफक वापर करावा.
  • बाजारात मिळणार्‍या कीटकनाशकाच्या बाटलीसोबतच्या माहितीपत्रकानुसार व अधिकृत शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर करावा.
  • कीडनाशक फवारणीपूर्वी किडींची संख्या आणि आर्थिक नुकसानपातळी विचारात घेऊन आवश्यक असेल तरच फवारणी करावी.
  • कीटकनाशकांच्या दोन फवारणीतील अंतर प्रमाणित शिफारशीनुसार ठेवावे, माहितीपत्रकात किंवा इतरत्र शिफारस केलेला काढणीपूर्व प्रतिक्षा कालावधी उलटल्यावर पिकाची काढणी करावी.
  • रासायनिक कीटकनाशकांचा वापर पिकांच्या वाढीच्या सुरूवातीच्या काळात करावा आणि काढणीच्या काळात वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा.
  • पिकावर किडीचा ५ टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव असल्यास निमयुक्त आणि जैविक किडनाशके फवारावीत. मात्र १० टक्के पर्यंत उपद्रव असल्यास रस शोषण करणार्‍या किडींसाठी शिफारसीनुसार आंतरप्रवाही रासायनिक किडनाशके तर पाने खाणार्‍या व पोखरणार्‍या अळ्यांसाठी स्पर्शजन्य /जठर विषे वापरावीत.
  • किडींचा उपद्रव ५ ते १०टक्के पर्यंत असल्यास पिकाचे २ मिटरचे पट्टे धरून एकाआड एका पट्‌ट्यावर किंवा फळझाड पिकांच्या एकाआड एक गल्लीवर किडनाशके फवारावीत. यामुळे किडींच्या नैसर्गिक शत्रुंचे संधारण होऊन रासायनिक किडनाशकांचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते.
  • फळे आणि भाजीपाला काढणीयोग्य झाल्यावर म्हणजे काढणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर रासायनिक किडनाशकांची फवारणी बंद करून त्याऐवजी जैविक कीडनाशके वापरावीत.
  • मानवी आरोग्यास व पर्यावरणास कमी हानीकारक असलेली, तसेच कमी मात्रामध्ये अधिक परिणामकारक किड नियंत्रण करणारी कीटकनाशके वापरावीत.
  • निर्यातीपूर्वी शेतमालाची कीडनाशक अंश चाचणी करून अंश नसल्याची खात्री करावी आणि मगच निर्यात करावी.

विषमुक्त पिके का आवश्यक आहेत? | Why are toxin-free crops necessary?

विषमुक्त पिके मानवी आरोग्य, पर्यावरणीय टिकाऊपणा आणि पर्यावरणाच्या एकूण कल्याणाशी संबंधित अनेक कारणांसाठी आवश्यक आहेत. विषमुक्त पिकांची लागवड का आवश्यक आहे याची काही प्रमुख कारणे येथे आहेत:
  • मानवी आरोग्यास विषमुक्त पिकेच आवश्यक :  कीटकनाशके, तणनाशके आणि मायकोटॉक्सिन यांसारख्या पिकांमधील विषारी द्रव्ये दीर्घकालीन रोग, विकासात्मक समस्या आणि तीव्र विषबाधा यासह गंभीर आरोग्य धोके निर्माण करू शकतात. म्हणून हानीकारक विषमुक्त पिकांचे सेवन करणे मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
  • अन्न सुरक्षेत विषमुक्त पीकेच हवीत :  दूषित पिकांमुळे अन्नजन्य आजार होऊ शकतात आणि अन्न पुरवठ्याच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ शकते. म्हणून विषमुक्त पिके अन्न साखळीतील दूषित घटकांची उपस्थिती कमी करून अन्न सुरक्षिततेला हातभार लावतात.
  • कमी रासायनिक एक्सपोजर: अनेक शेतीपद्धतींमध्ये वापरल्या जाणारे  कीटकनाशके आणि तणनाशके पिकांवर अवशेष सोडू शकतात. विषमुक्त पिकांची लागवड करून, शेतकरी आणि ग्राहक संभाव्य हानिकारक रसायनांचा संपर्क कमी करू शकतात. 
  • विषमुक्त शेतीमुळे जैवविविधता संवर्धन: विषमुक्त शेती पद्धती पर्यावरणावर होणारा नकारात्मक प्रभाव कमी करून जैवविविधतेच्या संवर्धनास हातभार लावतात.
  • मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी विषमुक्त शेती : रासायनिक कीटकनाशके आणि खतांचा सतत वापर केल्याने कालांतराने मातीचे आरोग्य बिघडू शकते. विषमुक्त शेती पद्धती, जसे की सेंद्रिय शेती, नैसर्गिक प्रक्रियांद्वारे मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर, दीर्घकालीन टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते.
  • पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी विषमुक्त शेती: रासायनिक कीटकनाशके आणि खतांनी प्रक्रिया केलेल्या शेतातून वाहून गेल्याने पाण्याचे स्त्रोत दूषित होऊ शकतात, ज्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. विषमुक्त शेती पद्धती जलप्रदूषण कमी करण्यास, जलीय परिसंस्थेला फायदा होण्यास आणि पिण्याचे सुरक्षित पाणी सुनिश्चित करण्यास मदत करते.
  • प्रतिकार व्यवस्थापनात विषमुक्त शेती उपयोगी : रासायनिक कीटकनाशकांचा दीर्घकाळ वापर केल्यास प्रतिरोधक कीटक लोकसंख्येचा विकास होऊ शकतो. विषमुक्त शेती, विशेषतः एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पध्दती, प्रतिरोधक कीटकांचा उदय रोखण्यास मदत करते आणि शाश्वत कीटक नियंत्रण पद्धतींना प्रोत्साहन देते.
  • हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी विषमुक्त शेती : विषमुक्त शेती, विशेषत: सेंद्रिय शेती पद्धती, बहुतेकदा कृषी पर्यावरणीय तत्त्वांवर जोर देते जे हवामान बदल कमी करण्यासाठी योगदान देऊ शकतात. या पद्धती मातीचे आरोग्य सुधारणे, कार्बन वेगळे करणे आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे यावर लक्ष केंद्रित करतात.
  • विषमुक्त शेतमालास ग्राहक प्राधान्ये: कृत्रिम रसायनांपासून मुक्त असलेल्या खाद्यपदार्थांची ग्राहकांमध्ये वाढती मागणी आहे. विषमुक्त पिके सेंद्रिय आणि शाश्वतपणे उत्पादित अन्नासाठी ग्राहकांच्या पसंतीनुसार पिकविली जातात, आरोग्यदायी आणि पर्यावरणास अनुकूल पर्यायांसाठी बाजारातील मागणीमध्ये योगदान देतात.
 मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी विषमुक्त पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. 

निष्कर्ष ( Conclusion)-

परंतु आपल्या रोजच्या अन्नात कीटकनाशकांच्या  अवशेषांचे प्रमाण दरवर्षी वाढत असूनसुद्धा पिकांवरील कीटकनाशकांचा वापर कुठेही कमी झालेला नाही. सरकारच्या आदेशाची वाट न पाहता आता शेतकर्‍यांनीच शेतमाल विषमुक्त कसा ठेवता येईल याबाबत काळजी घ्यावयास हवी. कारण विषमुक्त शेतीमध्ये बदल करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या मानसिकतीचे कार्य महत्त्वाचे आहे.

- योगेश रमाकांत भोलाणे
विषमुक्त शेतमालासाठी | For toxin-free agriculture विषमुक्त शेतमालासाठी | For toxin-free agriculture Reviewed by Yogesh Ramakant Bholane on ऑगस्ट ०६, २०२२ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.