व्हिडिओ कॉल आणि वर्क फ्रॉम होम साठी असा वाढवा इंटरनेट स्पीड | Increase internet speed for video calls and work from home

Increase internet speed for video calls and work from home
Increase internet speed

व्हिडिओ कॉल आणि वर्क फ्रॉम होमसाठी असा वाढवा इंटरनेट स्पीड

लॉऊकडाऊनमुळे सध्या बहुतांश लोक घरात राहूनच काम करत आहे. अशीच परिस्थिती आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. घरी काम करतांना कंपनीमधील कर्मचार्‍यांना किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना व्हिडीओ कॉलद्वारे किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिग ऍपद्वारे संबंधित काम किंवा शिक्षण घ्यावे लागत आहे. लॉकडाऊनची गरज समजून हे योग्य असले तरी घरात व्हिडीओ कॉलींगसाठी अपेक्षित स्पीड मिळत नाही आणि नेटवर्क सक्षम राहत नाही. त्यामुळे व्हिडीओ कॉल डिसकनेक्ट होतो किंवा नीट दिसत नाही किंवा ऐकू येत नाही अशा समस्या निर्माण होते. इंटरनेट पुरवठा करणारी सेवा सारखी असूनही व्हिडीओ कॉन्फरन्सिग मधील काही सदस्यांना काहीच समस्या येत नाही मात्र आपल्यालाच का समस्या येतात? अशा वेळी काय करावे?

या लेखातील मत्त्वाचे मुद्दे- 

  • फोन कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी इंटरनेट स्पीड
  • डाऊनलोड्स व अपडेट्स तात्पुरते करा बंद
  • इतर डिव्हाइस बंद ठेवा
  • घरात सर्वात जास्त इंटरनेट स्पीड कुठे ते शोधा
  • राऊटर असल्यास हे बदल करा
  • व्हिडिओ कॉलिंगच्या वेळी कॅमेराची स्थिती
  • फास्ट ब्राऊजर
  • कॉल स्विकारू नका किंवा येऊ देऊ नका
  • प्रिफर नेटवर्क सेटींग
  • व्हायरस स्कॅन
  • इतर ऍप ठेवा बंद
  • व्हिडीओ कॉलिंगचे ऍप
  • हेडसेटचा वापर करा
  • काही क्षण थांबत थांबत बोलत रहा
  • आपण बोलत नसतांना व्हिडीओ बंद ठेवा
  • अनावश्यक ऍप करा अनइंस्टॉल
  • कॅशे क्लिअर करा
  • स्पीड बुस्ट करणारे ऍप
  • निष्कर्ष ( Conclusion)

फोन कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी इंटरनेट स्पीड (Internet speed for phone calling and video calling) 

इंटरनेट वापरून फोन कॉल करायचा असेल तर ३०-५० केबीपीएस वेग पुरेसा होतो. व्हिडीओ कॉल करायचा असेल तर ४०० केबीपीएस जरूरी असतो. इंटरनेटवरून गाणी स्ट्रीम करून ऐकायची असतील तर साधारण १००-२०० केबीपीएस वेग लागेल. हेच जर व्हिडीओ पहायचे असतील तर निदान २ एमबीपीएस, आणि एचडी दर्जाच्या व्हिडीओसाठी ५ एमबीपीएस वेग लागेल. 
आणखी एक उदाहरण बघू. झूम ऍपमध्ये केवळ दोन व्यक्तींमध्ये व्हिडीओ कॉल होत असेल तर त्यासाठी एच.डी. व्हिडीओसाठी १.८ एमबीपीएस अपलोड आणि डाऊनलोड स्पीड जरूरी असतो तर एस.डी. व्हिडीओसाठी ०.६ एम.बी.पी.एस. स्पीड आवश्यक असतो. 

डाऊनलोड्स व अपडेट्स तात्पुरते करा बंद (Turn off downloads and updates temporarily) 

व्हिडीओ कॉलिंगच्या वेळी मोबाईल किंवा संगणकातील ऍप्स आणि सॉफ्टवेअर अपडेट्सला बंद करा. व्हिडिओ कॉल सुरू असताना हे अपडेटस्‌ही सुरूच राहिलेतर इंटरनेटचा स्पीट विभागला जातो. हे टाळण्यासाठी असे अपडेटस् तात्पुरते बंद करायला काहीच हरकत नसावी. हे अपडेट आपण नंतर करू शकता. 

इतर डिव्हाइस बंद ठेवा (Turn off other devices) 

इंटरनेट जर व्हाय फाय द्वारे मिळत असेल तर एकाच वायफायवर स्मार्ट टीव्ही, दुसरे मोबाइल, लॅपटॉप व इतर सर्व कनेक्ट असतात. अशात महत्त्वाचे काम किंवा व्हिडीओ कॉलिंग करतेवेळी इतर सर्व दुसरे डिव्हाइस बंद ठेवा. आपणास ज्या डिव्हाईस वर व्हिडीओ कॉलिंग वापरयाची आहे त्यासाठीच संपूर्ण इंटरनेट वापरा. आपणास अधिक नेटचा स्पीड मिळेल. 

घरात सर्वात जास्त इंटरनेट स्पीड कुठे ते शोधा- (Find out where the highest internet speed is at home ) 

प्रत्येक घरात विशिष्ट ठिकाणी इंटरनेटची रेंज सर्वोत्तम मिळते. ते ठिकाण शोधा. कोणत्या कोपर्‍यात जास्त स्पीड मिळतो, हे शोधणारे ऍप सुद्धा उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग त्या ऍपची खात्री करूनच करा. घरात विशिष्ट ठिकाणी स्पीड जास्त मिळत असेल तर त्याच ठिकाणी व्हिडीओ कॉलिंगसंबधी कामे उरकून घ्या

राऊटर असल्यास हे बदल करा  (Make these changes if you have a router)-

इंटरनेट राऊटरद्वारे मिळत असल्यास आणि राऊटरमधून वायफाय कनेक्शनमध्ये स्पीड कमी मिळत असल्यास वायरलेस काम करण्याऐवजी आपल्या डिव्हाईसला केबलच्या आधारे राऊटरशी कनेक्ट करा. केबलची सुविधा नसल्यास वायफाय सुरू असताना राऊटर डिव्हाइसजवळ ठेवा. 

व्हिडिओ कॉलिंगच्या वेळी कॅमेराची स्थिती ( Camera position during video calling ) 

व्हिडिओ कॉलवर मीटिंग करताना कॅमेरा स्थिर ठेवा. कॅमेरा हलत राहिल्यास अनेक अडचणीत येतात. त्याचा स्पीडवर परिणाम पडतो. क्षणाक्षणाला बदलते चित्र कॅच करून डिजीटल तंत्राद्वारे त्याची देवाण घेवाण करतांना जास्त इंटरनेट लागते, त्याचा थेट वाईट परिणाम इंटरनेट कनेक्टीव्हीटवर होतो. आपण जर विद्यार्थी असाल आणि केवळ लेक्चर ऐकणे किंवा बघणेच आपले काम असेल तर आपल्या डिव्हाईसच्या कॅमेरासमोर जास्त हालचाली करू नका किंवा आपला कॅमेरा बंद ठेवा, जेणेकरून केवळ लेक्रर देणार्‍या व्यक्तीच्या व्हिडीओसाठी उपलब्ध नेट व्यवस्थित वापरता येईल. 

फास्ट ब्राऊजरचा वापर  (Using a fast Browser )

अँड्रॉईडसाठी प्ले स्टोअरवर असे काही ब्राऊजर उपलब्ध आहेत की जे तुम्हाला उपलब्ध इंटरनेट स्पीडशी समन्वय साधून तुमचे काम जास्तीतजास्त योग्य पद्धतीने कसे होऊ शकेल यासाठी मदत करतात. यामध्ये ओपेरा मिनी, यूसी ब्राऊजर आणि क्रोम यांचा समावेश आहे. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की संगणाकावर सुद्धा आपण हेच ब्राउझर वापरतो मात्र संबंधित स्त्रोतचे मोबाईलमधील अँड्रॉईडसाठी याच नावाने वेगळे ब्राउझर असते. आमच्याच ब्राउझरमध्ये सर्वात्तम इंटरनेटचा स्पीड मिळतो, असा दावा करणारे अनेक ऍप आहेत, मात्र कोणतेही ऍप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची खात्री करा, रिव्ह्यूव तपासून घ्या. 

कॉल स्विकारू नका किंवा येऊ देऊ नका (Do not accept or allow calls) - 

व्हिडिओ कॉलदरम्यान इतर कॉल येणार नाही याबाबत काळजी घ्या, कॉल आला किंवा कॉल स्विकारला तर काही क्षण इंटरनेट बंद होते. पुन्हा कनेक्ट करतांना अडचणी येऊ शकतात. 

प्रिफर नेटवर्क सेटींग (Preferred network settings) 

तुम्हाला मोबाईलवर कोणतं नेटवर्क ठेवायचं ते सेटींगमध्ये जाऊन तुम्ही ठरवू शकता. २जी नेटवर्क असेल तर स्पीड कमी मिळेल. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन ३जी/४जी नेटवर्क निवडा. हे नेटवर्क निवडतांना आपले सीम कार्ड कोणत्या नेटवर्कसाठी पात्र आहे, हे सुद्धा तपासून घ्या. आपण जुनेच सीमकार्ड वापरत असाल तर आपले नेटवर्क ४ जी असूनही आपणास ३जी स्पीड मिळेल. म्हणून ४ जी साठी इलिजीबल नवीन सीम कार्ड आपणास जूने सीमकार्ड जमा केल्यावर संबंधित अधिकृत केंद्रातून मिळू शकेल. हे सीम बदलतांना आपला नंबर मात्र तोच राहील, याची काळजी घ्या. 

व्हायरस स्कॅन (Virus Scan) - 

मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये उच्च दर्जाचे व्हायरस स्कॅन ऍप किंवा सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे. व्हिडीओ कॉलिंगच्या अगोदर व्हायरस स्कॅन करून घ्या. कारण फायरवॉल चांगल्या पद्धतीने कॅन्फीगर झाली तर इंटरनेट स्पीड व्यवस्थित मिळतो. 

 इतर ऍप ठेवा बंद (Keep other apps closed) 

आपल्या कळत नकळत मोबाईल किंवा लॅपटॉपवर काही ऍप सुरूच असतात. ते व्हिडीओ कॉलिंग दरम्यान कसे बंद ठेवता येतील याची जाणकरांकडून माहिती घ्या. असे ऍप बंद ठेवल्यास व्हिडीओ कॉलिंगला कनेक्टीव्हीटीची समस्या येत नाही. 

व्हिडीओ कॉलिंगचे ऍप (Video Calling App ) -

व्हिडीओ कॉलिंगसाठी विविध ऍप उपयोगात आणले जातात. आपणास जरूरी असलेल्या ऍपच्या सेटींगचा अभ्यास करा, व्हिडीओचा दर्जा एस.डी. किंवा एच.डी. किंवा रिझोल्यूशनच्या सेटींगमध्ये योग्य ते बदल केल्यास आपणास आपल्या डिव्हाईसमधील इंटरनेटचा स्पीड कुठलीही समस्या न येता वापरता येईल. 

हेडसेटचा वापर करा ( Use a headset ) -

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी लॅपटॉपचा किंवा मोबाईलचा इनबिल्ट मायक्रोफोन व स्पीकरचा वापरला जातो. मात्र बहुतांश लॅपटॉपच्या किंवा मोबाईलच्या इनबिल्ट मायक्रोफोन्सची गुणवत्ता व्हिडीओ कॉलिंगसाठी योग्य नसते. यामुळे यात आवाज स्पष्ट येत नाही. हा आवाज कॅच करायला आणि त्यावर प्रक्रिया करायला जास्तीचे इंटरनेट खर्ची पडते, हे टाळण्यासाठी आपण हेडसेटचा वापर करू शकतात. यामुळे आवाजाचा अडथळा निर्माण होणार नाही आणि कनेक्टीव्हीची समस्याही येणार नाही. 

काही क्षण थांबत थांबत बोलत रहा ( Keep pausing for a moment )

व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू असताना होस्ट व्यक्ती नेहमीप्रमाणे वेगात बोलत रहातो, मात्र त्याच वेगाने त्याचा आवाज इतरांपर्यत पोहचत नाही आणि व्हिडीओ आणि ऑडीओ यांच्यामधील ताळमेळ बिघडतो. म्हणून होस्टने प्रत्येक तीन वाक्यानंतर एक दोन क्षण थांबून पुढचे बोलणे सुरू करणे योग्य ठरते. 

आपण बोलत नसतांना व्हिडीओ बंद ठेवा ( Turn off video when you're not talking) 

आपण समोरच्याला दिसणे जरूरी नसेल तर आपला व्हिडीओ बंद ठेवा. तसेच आपण बोलत असतांना आपणास सगळ्यांनी बघणे जरूरीचे असते, तेव्हा आपला व्हिडीओ सुरू असतो, मात्र आपण बोलत नसाल आणि केवळ ऐकण्याचीच भूमिका निभावत असाल तर अशावेळी व्हिडीओ बंद ठेवल्यास आपणास विनाअडथळा संपूर्ण मिटींगचा आनंद घेता येईल. 

अनावश्यक ऍप करा अनइंस्टॉल (Uninstall unnecessary apps ) -

लॉकडाऊनच्या अगोदर आपण मोबाईलमध्ये अनेक अनावश्यक ऍप केवळ मनोरंजनासाठी डाऊनलोड केलेले असू शकतात. मात्र आता लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिगचे महत्त्व वाढल्याने त्यासंबंधी ऍप मोबाईलमध्ये आवश्यक झाले आहेत. या आवश्यक ऍपवर इतर अनावश्यक ऍप जास्त असल्यास इंटरनेट स्पीडवर परिणाम करतात. म्हणून तुम्हाला ज्या ऍपची गरज नसेल तर ते अनइंस्टॉल करा. 

 कॅशे क्लिअर कर ( Clear the cache ) - 

कॅशे मेमरी जास्त होईल तेव्हा इंटरनेटचा वेग मंदावतो. इंटरनेट स्पीड कमी मिळत असेल तर कॅशे मेमरी क्लिअर करा. 

स्पीड बुस्ट करणारे ऍप (Speed boost app) - 

इंटरनेट स्पीड बूस्ट करणारे अनेक ऍप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मात्र कोणतेही ऍप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची खात्री करा, रिव्ह्यूव तपासून घ्या.

निष्कर्ष ( Conclusion)-

इंटनेटचा स्पीड वाढविण्यासाठी असे अनेक पर्याय आहेत. प्रथम आपणास कोणती समस्या आहे ते तपासा आणि योग्य पर्याय निवडा. स्पीड वाढविणे शक्य नसल्यास काही क्षण थांबत थांबत बोलत रहा, आपण बोलत नसतांना व्हिडीओ बंद ठेवा, अनावश्यक ऍप करा अनइंस्टॉल, कॅशे क्लिअर करा, स्पीड बुस्ट करणारे ऍप असे पर्याय आपण निवडू शकतात. 

Image Source:- 1) little-girl-taking-online-classes-4261789 Photo by August de Richelieu from Pexels,
व्हिडिओ कॉल आणि वर्क फ्रॉम होम साठी असा वाढवा इंटरनेट स्पीड | Increase internet speed for video calls and work from home व्हिडिओ कॉल आणि वर्क फ्रॉम होम साठी असा वाढवा इंटरनेट स्पीड | Increase internet speed for video calls and work from home Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जुलै ०८, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.