व्हायरस पासून सुरक्षेसाठी मोबाईल असा ठेवा स्वच्छ | Keep mobile clean for protection from viruses

Keep mobile clean for protection from viruses
Virue free mobile

व्हायरस पासून सुरक्षेसाठी मोबाईल असा ठेवा स्वच्छ

त्या व्हायरसुळे लाखो लोक संक्रमित झाले आहे आणि हजारो लोक मृत्युमूखी पडले आहेत. त्यावर चर्चा तर रोजच होत आहे. स्वच्छता बाळगा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा याबाबी तर सर्वश्रूत आहेत. वारंवार हात धुवायची सुचना तर आता लहान मुलेही पाळत आहे. त्यासोबत प्रत्येकाच्या हातात नेहमी दिसणारा स्मार्टफोन सुद्धा वारंवार स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे. हा स्मार्टफोन केव्हा आणि कसा स्वच्छ करायचा यावर प्रस्तुत लेखात माहिती सादर करण्यात आली आहे.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे-
  • केवळ हातच नव्हे तर व्हायरस पासून सुरक्षेसाठी मोबाईल पण स्वच्छ ठेवणे आवश्यक
  • स्मार्टफोन का स्वच्छ करावा?
  • अस्वच्छ मोबाईल वापरण्याचे धोके
  • मोबाईल स्वच्छ करण्याअगोदर
  • स्मार्टफोन कसा आणि किती वेळा स्वच्छ करायचा?
  • मोबाईल स्वच्छ करतांना ही काळजी घ्या
  • निष्कर्ष 

केवळ हातच नव्हे तर व्हायरस पासून सुरक्षेसाठी मोबाईल पण स्वच्छ ठेवणे आवश्यक

दोन वर्षांपूर्वी स्मार्टफोनच्या बाबतीत एका अहवालाने सर्वांचे लक्ष वेधले होते. एका संस्थेने त्यावेळी संशोधन केले होते. त्या संशोधनात त्यांनी मोबाईलच्या स्क्रीनवर असलेल्या जंतूचा अभ्यास केला आणि स्मार्टफोन युजर स्मार्टफोन कितीवेळा स्वच्छ करतात याबाबत सर्व्हेही केला. या संशोधनातून तयार झालेल्या अहवालात म्हटले होते की स्मार्टफोनच्या स्क्रीनवर टॉयलेट सीटच्या तुलनेत तीन पट अधिक जंतू असतात. तेव्हा या अहवालावर बरीच चर्चा झाली होती. आता या व्हायरसच्या काळात स्मार्टफोनच्या स्वच्छतेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास हात वारंवार धूत असताना स्मार्टफोन सुद्धा स्वच्छ ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्मार्टफोन का स्वच्छ करावा? Why clean a smartphone?  

सर्दी, खोकला होऊ नये आणि व्हायरसचे संक्रमण होऊ नये म्हणून आपण मास्क लावतोय पण हा आजार हवेतून आणि स्पर्शातूनही पसरतोय हे जास्त धोकेदायक आहे. त्यामुळे एकमेकांना हात मिळविणे किंवा गळाभेट आपण बंद केल, पण आपल्या मोबाईलवर व्हायरस तर चिकटला नसेल ना अशी शंका असूनही मोबाईलचा वापर बंद करणे शक्य झाले नाही. आता आरोग्याशी निगडीत अनेक संस्थानी स्मार्टफोनच्या स्क्रीनवर संशोधन सुरू केले आहे. त्यानुसार स्मार्टफोनच्या होम बटनवर शेकडो हानिकारक बॅक्टेरिया असतात. 
   
आपला मोबाइल फोन तर दिवसभर कित्येक तास आपल्या हातात असतो आणि आपले हात अनेक ठिकाणी स्पर्श करीत असतात. घराबाहेर पडत असाल तर हात कुठे कुठे स्पर्श करतात याचा हिशोबच करता येत नाही. यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. अनेक ठिकाणी स्पर्श केलेल्या पृष्ठभागाचे जंतू हातावर येतात आणि हातावरून मोबाईलवर येतात. व्हायरसचे हे मोबाईलच्या स्क्रीनवरील आगमन थांबविण्यासाठी, आपल्याला वारंवार आपला हात आणि मोबाइल फोन निर्जंतुक करणे जरूरीचे आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या खिशातून किंवा बॅगमधून मोबाईल काढून त्याचा वापर केल्यास या ना त्या मार्गे त्यावर जंतू दाखल होऊ शकतात. म्हणून घरी वापरण्यापूर्वी किंवा कार्यालयात गेल्यावर तो साफ करून घेतलाच पाहिजे. 

लोकांच्या संपर्कात आल्यास आपल्या मोबाइल फोनचा पृष्ठभाग व्हायरसचा वाहक बनू शकतो. सार्वजनिक ठिकाणी आपल्या खिशातून किंवा बॅगमधून मोबाईल फोन वापरण्यासाठी काढला असेल तर आपण घरी वापरण्यापूर्वी तो साफ केला आहे याची खात्री करणे जरूरीचे झाले आहे. 

खोकला किंवा शिंक लागलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यास किंवा आपणास स्वत: सर्दी-खोकला असल्यास आपल्या मोबाइल फोनचा पृष्ठभाग व्हायरसचा वाहक बनू शकतो. आपण स्मार्टफोन स्वच्छ न करता तसाच वापरल्यास विषाणू आपल्याला संक्रमित करू शकतो किंवा आपल्या घरात दाखल होऊ शकतो. 

अस्वच्छ मोबाईल वापरण्याचे धोके | Dangers of using unclean mobile phones

  1. जिवाणू आणि विषाणूजन्य प्रदूषण: हात, पृष्ठभाग आणि विविध वातावरणाच्या संपर्कात राहिल्यामुळे मोबाईल फोनवर बॅक्टेरिया आणि विषाणू गोळा होतात. अस्वच्छ मोबाईल फोन वापरल्याने तुमच्या हातावर आणि चेहऱ्यावर हानिकारक सूक्ष्मजीव पसरण्याचा धोका वाढतो.
  2. आजारपणाचा वाढलेला धोका: अस्वच्छ मोबाईल फोनला स्पर्श करणे आणि नंतर आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे, विशेषत: आपले तोंड, नाक किंवा डोळे, संसर्ग किंवा आजार होण्याची शक्यता वाढवू शकते. फोनच्या पृष्ठभागावरील बॅक्टेरिया आणि व्हायरस सहजपणे श्लेष्मल त्वचेवर हस्तांतरित केले जाऊ शकतात.
  3. त्वचेच्या समस्या: घाणेरडे अस्वच्छ मोबाईल फोन त्वचेच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात, ज्यात मुरुम आणि चिडचिड यांचा समावेश आहे. फोनच्या पृष्ठभागावरील तेल, घाम आणि बॅक्टेरिया त्वचेवर जमा होऊ शकतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात किंवा वाढू शकतात.
  4. फोनची कार्यक्षमता कमी केली: अस्वच्छ मोबाईल फोनच्या स्क्रीन, बटणे किंवा पोर्टवर साचलेली घाण, धूळ आणि मोडतोड त्याच्या कार्यक्षमतेत अडथळा आणू शकते. घाणेरडा फोन अवरोधित पोर्टमुळे कमी प्रतिसाद, खराब स्पर्श कार्यक्षमता किंवा चार्जिंगमध्ये अडचण येऊ शकतो.
  5. बिघडलेली स्क्रीन दृश्यमानता: अस्वच्छ मोबाईल गलिच्छ स्क्रीनमुळे दृश्यमानता आणि वापरकर्ता अनुभव खराब होऊ शकतो. स्क्रीनवरील डाग, फिंगरप्रिंट्स आणि घाण डिस्प्लेमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि फोन वाचणे किंवा वापरणे कठीण करू शकतात.
  6. संभाव्य ऍलर्जी: घाणेरड्या अस्वच्छ मोबाईल फोनवर जमा होणारी धूळ आणि ऍलर्जी काही व्यक्तींमध्ये ऍलर्जीक प्रतिक्रियांमध्ये योगदान देऊ शकतात. ऍलर्जी किंवा संवेदनशीलता असलेल्या लोकांना नियमितपणे साफ न केलेल्या फोनच्या संपर्कात असताना लक्षणे दिसू शकतात.

मोबाईल स्वच्छ करण्याअगोदर | Before cleaning the mobile 

  1. मोबाईलला लावलेले इअर फोन्स किंवा कोणतीही डेटा केबल काढा आणि फोन बंद करा. 
  1. फोन कव्हरमध्ये असेल तर कव्हर काढून ठेवा. 
  1. मुलायम कपड्याने (स्क्रीन पुसण्यासाठी खास कपडा- microfiber cloth देखील मिळतो.) हळूवारपणे मोबाइलचा सर्व पृष्ठभाग स्वच्छ करा. चुकूनही इतर कठीण किंवा खरबरीत कापड किंवा कागदाने मोबाईल पुसणे टाळा. ते गुळगुळीत नसल्यामुळे फोनच्या स्क्रिनवर ओरखडे निर्माण होऊ शकतात. 

स्मार्टफोन कसा आणि किती वेळा स्वच्छ करायचा? (How and how often to clean a smartphone? )

वर्तमानपत्र, टी.व्ही.वरील बातम्या आणि इंटरनेटवरील बातम्या अभ्यासून स्मार्टफोनच्या बाबतीत खालील निष्कर्ष समारे आले आहेत. 

  • सध्या गाजत असलेल्या व्हायरसपासून वाचवण्यासाठी अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरने मोबाईल स्वच्छ करणे जरूरी आहे. हे फार सोपे आहे. यासाठी फोनच्या स्क्रीनवर एक थेंब सॅनिटायझर टाका आणि कॉटन पॅडने ते स्क्रीनवर सगळीकडे पसरवा आणि स्क्रीन साफ करून घ्या. तसे तर या लॉकडाऊनच्या काळात सर्व हुशार झाले आहेत. तरी सुद्धा एक बाब आवर्जून नमूद कराविशी वाटते, ती म्हणजे बोटलमधून सॅनिटायझर स्क्रीनवर टाकतांना एक-दोन थेंबच पडेल याची काळजी घ्या, खूप जास्त पडल्यास मोबाईल खराब होऊ शकतो. 
  • सॅनिटायझरच्या ऐवजी ७० % `अल्कोहोल-आधारित सोल्यूशन / द्रावण चा -alcohol-based solution (70%) उपयोग  करू शकता  
  • ऑफिसपासून घरी येत असताना आणि घरातून ऑफिसला जाताना सुद्धा मोबाईल वरील पद्धतीने स्वच्छ करा. 
  • आपण घरीच असाल तर किमान दिवसातून दोनदा फोन आवश्य स्वच्छ करा. आपण जर कार्यालयात किंवा घराबाहेर जात असाल तर संक्रमाणापासून सुरक्षित राहण्यासाठी दर ९० मिनिटाला स्पिरिट किंवा हँड सॅनिटायझरने स्मार्टफोन स्वच्छ करा. 
  • आता मोबाईल स्क्रीनच्या स्वच्छतेसाठी अँटीव्हायरल वाइप / Antiviral wipe / disinfectant wipes उपलब्ध झाले आहेत, त्याचा वापरही आपण करू शकता. 
  • सॅनिटायरझर उपलब्ध नसल्यास अनेकजण मोबाईल पाण्याने कोणत्याही कापडाने पुसतात. मात्र ही पद्धत अतिशय चुकीची असून यामुळे तुमचा मोबाईल बिघडण्याची शक्यता आहे. सॅनिटायझर उपलब्ध नसल्यास फोनला कपड्याने स्वच्छ करण्यासाठी प्रथम कापड पाण्याने आणि साबणाने भिजवून फोन पुसून घ्यावा. कापडातून साबणाचे पाणी निथरेल इतके ओले करू नका आणि साबणाचे पाणी थेट मोबाईलवर टाकू नका, अन्यथा फोन नक्की खराब होईल. साबणाच्या पाण्याने पुसल्यावर लगेच कोरड्या फडक्याने फोन पुसून घ्या, यामुळे मोबाईलवरील पूर्ण ओलसरपणा निघून जाईल. त्यानंतर पाच ते दहा मिनिटे मोबाईल सुकवा. मोबाईल पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर तो चालू करुन वापरू शकता.

antiviral wipe mobile cleaning
Mobile cleaning with antiviral wipe

मोबाईल स्वच्छ करतांना ही काळजी घ्या (Care while cleaning the mobile )

  • मोबाईलच्या स्पीकर, माईक आणि हेडफोनच्या -headphone छिद्रांद्वारे मोबाईल स्वच्छ करण्याचा द्रव पदार्थ थेट मोबाईलच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो. म्हणून अशा ठिकाणी स्वच्छतेची खूप जास्त काळजी घ्या. विशेष करून तुम्ही जर साबणाच्या पाण्याचे मोबाईल स्वच्छ करत असाल.
  • साबणाच्या/ डिटर्जंण्टच्या (detergent) पाण्याने मोबाईल स्वच्छ करतांना सर्वात कास्त काळजी घ्या. मोबाईल पाण्याच्या संपर्कात आणू नये, अशा सुचना प्रत्येक मोबाईल कंपनीच्या मार्गदर्शक पुस्तकात दिलेल्या असतात. म्हणून वर दिलेल्या सुचना तंतोतंत पाळा.
  • सॅनिटायझरने मोबाईल स्वच्छ करतांना उत्तम दर्जाचेच सॅनिटायझर उपयोगात आणा. आता काही सॅनिटायझर कृत्रिम सुगंधयुक्त ( scented sanitizer) असतात किंवा हात कोरडे राहू नये म्हणून त्यात कृत्रिम चिकटपणा / तेकटपणा टाकलेला असतो. त्याचा अंश तुमच्या मोबाईलवरू राहू शकतो आणि पुढे मोबाईल वापरतांना त्याचा त्रास होऊ शकतो. 
  • काही जणांनी व्हिनेगरने ( vinegar) मोबाईल स्वच्छ करण्याच्या सुचना केल्या आहेत, मात्र तसे करू नका. व्हिनेगरने मोबाईलचा स्क्रीन खराब होऊ शकतो. तरीसुद्धा व्हिनेगरने मोबाईल स्वच्छ करायचाच असेल तर व्हिनगिरचे डायलूटेट द्रावण ( ५० टक्के) वापरा आणि अशा द्रावणाने फक्त मोबाईलची मागची बाजू आणि कडा स्वच्छ करा.
  • मोबाईल स्वच्छ करण्यासाठी मेकअप रिमूव्हर, कागदाचे रूमाल ( paper towel), किचन क्लिनर, विंडो क्लिनर वापरू नका.

निष्कर्ष ( Conclusion)-

त्या व्हायरसचा प्रताप आणि लॉकडाऊनयुक्त परिस्थितीमुळे केवळ हातच नव्हेतर मोबाईलपण वारंवार स्वच्छ करण्याची गरज आहे. तो कसा स्वच्छ करायचा, केव्हा करायचा आणि कोणती काळजी घ्यावी याबाबत आपण जागरूक झाला असालच. आपल्या काही सुचना असल्यास टिप्पणी/ कमेंट मध्ये पोस्ट करा.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

व्हायरस पासून सुरक्षेसाठी मोबाईल असा ठेवा स्वच्छ | Keep mobile clean for protection from viruses व्हायरस पासून सुरक्षेसाठी मोबाईल असा ठेवा स्वच्छ | Keep mobile clean for protection from viruses Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जुलै ०९, २०२० Rating: 5

1 टिप्पणी:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.