वेदनारहित बियाणे थेरपी | Painless Seed Therapy

painless seed therapy
Seed Therapy

 वेदनारहित बियाणे थेरपी

Painless Seed Therapy

सुजोक थेरपी, कलर थेरपी, डान्स थेरपी, ऍपीथेरपी, ऍक्युप्रेशर थेरपी आणि योगा थेरपी अशा थेरपीचे उपचार सहसाकरून कुणी स्वत:हून प्रेरित होऊन घेतांना दिसत नाही. प्रचलित थेरपी जशा ऍलोपॅथी, होमिओपॅथी किंवा आयुर्वेदीक अशा पॅथींकडूनसुद्धा जेव्हा दुखणे बरे होत नाही, तेव्हा नाईलाजास्तव रूग्ण अशा वेगळ्या पॅथींकडे वळतो. अशा वेगळ्या पॅथींमध्ये आता आणखी एका पॅथीची भरपडली आहे, ती म्हणजे सीड थेरपी. सीड थेरपी ही वेदनारहित आणि आकलनक्षम थेरपी आहे.

बियाणे थेरपी, ज्याला बीज उपचार किंवा बिजा चिकित्सा म्हणून देखील ओळखले जाते, ही वैकल्पिक औषध प्रणालींमध्ये, विशेषत: आयुर्वेद आणि पारंपारिक चीनी औषधांमध्ये पारंपारिक प्रथा आहे. या थेरपीमध्ये उपचारात्मक हेतूंसाठी विविध वनस्पतींच्या बियांचा वापर केला जातो. असे मानले जाते की बियांमध्ये अंतर्निहित गुणधर्म (inherent properties ) आहेत जे आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतात आणि विशिष्ट आजारांना तोंड देऊ शकतात.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • सीड थेरपीमागील तर्क
  • अशी काम करते सीड थेरपी
  • सीड थेरपीसाठी धान्य
  • सीड थेरपीसाठी बियाणे वापरतांना घ्यावयाची काळजी
  • निष्कर्ष 

सीड थेरपीमागील तर्क | Logic behind Seed Therapy 

मानवी शरीरात करोडो सूक्ष्म नसांचे जाळे (चेता प्रवाहांचे) असते. या चेतना प्रवाहांशी जोडलेले, त्यांना उद्दीपीत करणारे पॉईंटस् आपल्या हातावर व पायांवर असतात. विशिष्ट व्याधीत चेतना प्रवाह खण्डीत होतो किंवा अपेक्षित परिणाम दाखवित नाही. तेव्हा विशिष्ट बिंदूवर विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट प्रमाणात आणि विशिष्ट दिशेने दाब दिल्यास त्यातील चेतना प्रवाह अखंडितपणे सुरू होतो व त्याच्याशी संबंधित अवयवांचे दुखणे बरे व्हायला मदत होते. या दाबाचे प्रमाण व्यक्तिनुरूप, व्यक्तीचे वय, लिंग, दुखण्याच्या तीव्रतेनुरूप व व्यक्तीच्या सहनशीलतेनुरूप ठरवावे लागते. 
    थोडक्यात सांगायचे झाले तर वनस्पतींच्या बियाण्यांमध्ये सामर्थ्यशाली ऊर्जा आणि चुंबकीय शक्ती असते. असे बी जेव्हा मानवाच्या संपर्कात येते तेव्हा मानवातील घातक असणारी उर्जा बदलून त्याचे रूपांतर महत्तवपूर्ण आणि निरोगी उर्जेत होते. 

Seed-Therapy-treatment
Seed-Therapy-treatment

अशी काम करते सीड थेरपी ( Seed therapy works like this )

सीड थेरपीमध्ये हातापायाच्या विशिष्ट बिंदूवर, विशिष्ट पद्धतीने दाब देऊन मेथीचा दाणा किंवा विशिष्ट दाणा चिकटपट्टीच्या सहाय्याने चिकटवतात. असे बिंदू शोधतांना सबंधित अवयव सीड थेरपीसाठी अनुकूल आहे किंवा नाही याची दक्षता घ्यावी लागते. अशा प्रकारे पॉईंट्‌स लावल्याबरोबर सर्रकन त्या बिंदूपासून रक्तप्रवाह सुरू झालेला जाणवतो. नंतर तिथला ब्लॉक निघून गेल्यावर पेंशटला आराम वाटू लागतो. अर्थात हे केवळ एकदाच दाणे चिकटवून होत नाही, त्यासाठी आवश्यकतेनुसार सिटींग्ज घ्याव्या लागतात. तसेच हे पॉईंटस् कसेही लावून चालत नाही, ते ठराविक क्रमांनी आणि ठराविक दिशेने दाब देऊनच लावावे लागतात. यात प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही तर अपेक्षित परिणाम दिसत नाही. 

    अपेक्षित परिणाम साधण्यासाठी बियाण्यांचा वापर काही तासांपासून एक दिवस किंवा कित्येक दिवस करावा लागू शकतो. त्यासाठी वर उल्लेख केलेल्या सिटींग्ज महत्त्वाच्या ठरतात. हे पॉईंट्‌स लावल्यावर रूग्णामध्ये कधी कधी ताप येणे, जुलाब होणे वगैरे गोष्टी होऊ शकतात, परंतु घाबरून जायचे कारण नाही, उलट असे परिणाम दिसलेतर तो ट्रीटमेंटला प्रतिसाद देतो हे सिद्ध होते. काहींच्या मते सीड थेरपी म्हणजे आयुर्वेदिक ऍक्युप्रेशरच होय. कारण पंचमहाभुताप्रमाणे शरीरात सातही चक्रांच संतुलन असणंही खूप आवश्यक असतं, धान्यातून हे संतुलन साधणे शक्य होते. बियाणे थेरपी पचन सुधारणे, वजन व्यवस्थापनास समर्थन देणे, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि विशिष्ट आरोग्य परिस्थितींचे निराकरण करणे यासह अनेक प्रकारचे आरोग्य फायदे देतात

सीड थेरपीसाठी धान्य | Grains for Seed Therapy

आयुर्वेदामध्ये, भारतातील पारंपारिक औषध पद्धती, बियांमध्ये विशिष्ट गुण (गुण) आणि अभिरुची (रस) असतात असे मानले जाते जे दोषांवर (वात, पित्त आणि कफ) प्रभाव टाकू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या दोषाच्या असंतुलनावर आधारित बियाणे थेरपीची शिफारस केली जाते. सीड थेरपीसाठी सीड अर्थातच धान्य कोणते घ्यावे याबाबतही अनेक नियम या थेरपीत घालून दिलेले आहेत. शरीरातील ज्या अवयवाला दुखणे आहे, त्या अवयवायाच्या आकारासारखे दिसणारे धान्य या थेरपीत उपयोगात आणले जाते. 

सीड थेरपीमध्ये उपयोगात येणाऱ्या बिया एक्यूप्रेशर पॉईंट्ससाठी नैसर्गिक उत्तेजक आहेत आणि सुजोक थेरपीचा देखील एक भाग आहेत. सीड थेरपीमध्ये  जलद बरे होण्यासाठी अतिरिक्त जीवनशक्ती पुरवली जाते. हिरवे हरभरे, राजमा, नाशपाती, गहू, मोहरी, द्राक्षाचे दाणेही उपचारासाठी वापरले जातात. योग्य आकार, आकार, रंग बिया किंवा सोयाबीनचे निवडले जातात.

    तसेच सीड थेरपीसाठी विषारी बियाणे, ऍलर्जी निर्माण करणारे बियाणे, खराब, सडलेले, रोगी बियाणे वापरू नयेत. ही थेरपी अनेक असाध्य रोगांवर गुणकारी असल्याचे सिद्ध झाली आहे. मधुमेह, हिमोग्लोबिन कमी होणे, गर्भाशयासंबधी आजार, हाडांचे आजार, किडनी आणि पोटासंबधी आजार, प्रोस्टेट संबधी आजारा अशा अनेक आजारांवर सीड थेरपीने चांगले परिणाम दाखविले आहेत. जूनाट आजारांवर अकुंरलेल्या विशिष्ट अशा बियाण्यांद्वारे उपचार केले जातात. काही ठिकाणी आंब्याची कोय, अक्रोड, मक्याचे कणीस, बांबूचेखोड, बटाटा, कंद, लिंबू, कांदा, गाजर याद्वारे मसाज करून उपचार केल्याची उदाहरणे आहेत. बियाणे थेरपीमध्ये वापरल्या जाणार्‍या बियांच्या उदाहरणांमध्ये मेथी, भोपळ्याच्या बिया, फ्लेक्ससीड्स, तीळ आणि मोहरी यांचा समावेश होतो. शंकूच्या आकाराचे सुया, पाने, पाकळ्या, कलम आणि विशेषत: बिया हात आणि पाय यांच्यातील चेतासंस्था क्षेत्रांना उत्तेजन देण्यासाठी शक्तिशाली आणि अतिशय कार्यक्षम आहेत. चेस्टनट, अक्रोड, आंब्याची कोय , स्ट्रोबिल, मका कणीस (कॉर्न) या बियांनी मसाज करणे खूप प्रभावी आहे

वनस्पतीच्या बिया खरंतर जिवंत जैविक वस्तू आहेत ज्यात शक्तिशाली ऊर्जा आणि स्वतःचे चुंबक क्षेत्र असते. अशा प्रकारचे बीज एखाद्या मनुष्याच्या संपर्कात मुद्दामून आणल्यास ते बीज घातक ऊर्जा व्यापून टाकते आणि त्या बदल्यात एक महत्त्वपूर्ण आणि निरोगी ऊर्जा देते.

 कोणत्या विकारांवर कोणते बियाणे योग्य आहे याचा थोडक्यात आढावा खालिलप्रमांणे - 

  • मूत्रपिंड, पोट - राजमा बीन
  • हृदय - काळा हरभरा
  • आतडे, शिरा, लांब हाडे - ओट्स, ब्रोम गॅस
  • बधिर कान - हिरवे हरभरे
  • पाठीचा कणा , सांधे – कल्म किंवा कार्नेशन स्टेमचा थोडासा भाग
  • मेंदूशी संबंधित समस्या - अक्रोड
  • डोळा - काळी मिरी
  • मधुमेह - द्राक्ष बियाणे, हरभरा, गव्हाच्या बिया

सीड थेरपीसाठी बियाणे वापरतांना घ्यावयाची काळजी | Precautions to be taken while using seeds for seed therapy

  1. बीज थेरपिसाठी वापरण्यात येणारे बियाणे काही तासांपासून एक दिवस किंवा अनेक दिवस टिकू शकते. गरज भासल्यास आणि  बिंदूला उत्तेजन देणे आवश्यक असेल तर त्यांचे नूतनीकरण केले पाहिजे. 
  2. उपचारानंतर बियाणे त्यांची रचना, आकार, रंग बदलू शकतात, जसे की ऊर्जा कमी होणे, नाजूक होणे, काळे होणे, आकार वाढणे किंवा कमी होणे, कुरकुरीत होणे, क्रॅक होणे किंवा तुकडे पडणे. असे बियाणे पुन्हा वापरू नये. 
  3. बियांमध्ये मोठी जीवनशक्ती असते आणि ते प्रभावित अवयवांशी संवाद साधतात आणि त्यांची शक्ती पुनर्संचयित करतात. म्हणून विषारी किंवा ऍलर्जीकारक असलेल्या वनस्पतीच्या बिया वापरू नये.
  4. सीड थेरपीचा अवलंब करताना उपचार करणाऱ्याचा अनुभव महत्वाचे आहे. म्हणून सीड थेरपी नेहमी अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पार पाडावी. 

निष्कर्ष ( Conclusion)-

ज्या आजारांवर त्वरित उपचार करणे आवश्यक नाही, अशा आजारांवर सीड थेरपी वापरण्यास हरकत नाही.  त्यामुळे कुठल्या आजारावर ही थेरपी अवलंबवावी हे सुद्धा विचारपूर्वक ठरवावे. म्हणूनच सीड थेरपीचे उपचार आपल्या बजेटमध्ये असल्यास आणि आजार गंभीर नसल्यास ही थेरपी वापरण्या हरकत नाही. सीड थेरपीचे वाईट परिणाम काहीही नसले म्हणजे भीती नाही, हे ठीक असले तरी अपेक्षित परिणाम साध्य झाले नाही तर संबंधित आजार दुखणे वाढवू शकतो त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून आपल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या नेहमी संपर्कात राहावे. 

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

---------------------------------
हे सुद्धा वाचा-
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने