जूनी नाणी चमकदार बनवा | Make Old Coins Shiny

Make Old Coins Shiny
Old Coins

जूनी नाणी चमकदार बनवा

नाणी स्वच्छ आणि चकचकीत करणे फार सोपे आहे आणि त्यासाठी लागणारी रसायने साधारणपणे प्रत्येकाच्या घरात असतात. मुले टी.व्ही. आणि मोबाईलवरील गेम खेळण्यापेक्षा नाणे गोळा करायला प्राधान्य देतात, हे बघून मोठ्यांनीही शोधून शोधून जुनी नाणी मुलांकडे जमा करायला हवी. मात्र जुनी नाणी चमकदार करण्यासाठी काही पद्धती या लेखात सादर केल्या आहेत. कारण अयोग्य पद्धतीने नाणी साफ केल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते आणि त्यांचे मूल्य व महत्व कमी होऊ शकते. म्हणून जुनी नाणी साफ करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी नेहमी नाणे तज्ञाचा सल्ला घ्या. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • जुनी नाणी जमा करण्यास सुरुवात
  • जूनी नाणी अशी होतात चमकदार
  • जुनी नाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती
  • निष्कर्ष

कॉलनीतल्या सर्व लहान मुलांनी ठरविले की या सुटीत विविध प्रकारची आणि निरनिराळ्या देशांची नाणी गोळा करून सर्वांचा मिळून नाण्यांचा संग्रह करायचा. ‘नाण्यांचा संग्रह’ ही संकल्पना सर्वांना आवडली. सर्व मुले-मुली नाणी गोळा करायच्या कामाला लागली. जमा केलेली सर्व नाणी एक आठवड्याने एकत्र करुन त्यानंतर त्याचे प्रदर्शन कसे भरवायचे याबाबत निर्णय घेण्याचे ठरले. नाणी जमविण्यासाठी काहींनी नातेवाईक आणि मित्रांकडे मागणी करून विविध नाणी गोळा केली. सर्व मुले टी.व्ही. आणि मोबाईलवरील गेम खेळण्यापेक्षा नाणे गोळा करायला प्राधान्य देतात, हे बघून मोठ्यांनीही शोधून शोधून जुनी नाणी मुलांकडे जमा केली. अशा प्रकारे नाण्यांचा संग्रह वाढत गेला.

जुनी नाणी जमा करण्यास सुरुवात | Old coins began to accumulate

बरोबर एक आठवड्याने निखिलच्या घरी सर्व एकत्र झाले. कोण कोणती नाणी जमा करतोय याची यादी प्रत्येकाने तयार केली होतीच. नाणी एकत्र केल्यावर ती त्यावर नमूद केलेल्या वर्षानुसार किंवा देशी-विदेशी या प्रकारे वर्गवारी करण्यात आली. थोड्यावेळाने कॉलनीतील ज्येष्ठ व्यक्ती दिनानाथ पवार त्यांच्याकडील जुनी नाणी तेथे जमा करायला आले. सर्व नाण्यांची वर्गवारी झाल्यावर एक गोष्ट पवार यांच्या निदर्शनास आली ती म्हणजे काही नाणी फार जुनी होती, त्यावरील माहितीही वाचता येत नव्हती, अशा नाण्यांचे करायचे काय? त्यांनी ही बाब मुलांना सांगितली. हे ऐकून सर्व मुलांनी एका सुरात सांगितले की आता जगतला बोलवावे लागेल. कारण विज्ञानवादी दृष्टीकोनातून प्रत्येक कृती करणारा विज्ञान प्रेमी जगत तेथे प्रसिद्ध होता. म्हणून निखिलने लगेच फोन लावला आणि सदर समस्येबाबत जगतला कळविले.

थोड्यावेळाने जगत निखिलच्या घरी आला. त्याने नाण्यांची स्थिती बघितली आणि पवार यांचे विचारही जाणून घेतले. नंतर तो म्हणाला,‘‘ हे बघा मित्रांनो, तुमचा नाण्यांचा संगह खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्याचे प्रदर्शन मांडण्याचा विचारही उत्तम आहे. प्रदर्शनात मांडण्यात येणारी सर्व नाणी स्वच्छ आणि त्यावरील संदेश वाचता येण्याजोगी असावी, हा तुमचा विचारही रास्तच आहे. तर चला आपण सर्व नाणी स्वच्छ करू या.’’

हे ऐकून निखिल म्हणाला,‘‘ ही नाणी आम्ही साबणाने स्वच्छ केली मात्र फारशी स्वच्छ झाली नाही, त्यासाठी खास रसायने लागत असतील तर तू सोबत काहीच आणलेले दिसत नाही.’’

जूनी नाणी अशी होतात चमकदार | Old coins become shiny

‘‘ नाणी स्वच्छ आणि चकचकीत करणे फार सोपे आहे आणि त्यासाठी लागणारी रसायने साधारणपणे प्रत्येकाच्या घरात असतातच, तुमची बडबड चालू असतांना मी मघाशी निखिलच्या आईकडून चार वस्तू आणल्या, त्या म्हणजे, एक कप, व्हिनेगर, मीठ आणि कागदाचा रूमाल. लोणची बनविण्यासाठी व्हिनेगर वापरले जाते, याची कल्पना तुम्हा प्रत्येकाला असेलच. तेच व्हिनेगर आपली नाणी स्वच्छ करणार आहे. तुमच्या समोरच ही नाणी मी आता काही क्षणात चकचकीत करून दाखवेल.’’जगतचे हे बोलणे ऐकून तेथील मुलांमध्ये नाणी स्वच्छ होण्याची कृती बघण्यासाठी कमालिची उत्सुकता निर्माण झाली. ही उत्सुकता जास्त न ताणता जगतने एका कपामध्ये कपाच्या २५ टक्के व्हिनेगर ओतले. त्यामध्ये एक छोटा चमचा (टीस्पून) मीठ टाकून ते द्रावण चांगले ढवळले. नंतर त्यात घाण-अस्वच्छ अशी दोन नाणी टाकली आणि २० सेकंदानंतर ती नाणी बाहेर काढून पाण्याने धुतली आणि कागदी रूमालाने पुसली. पुसल्यानंतर कागदी रूमालातून बाहेर आलेले चकचकीत नाणी पाहून सर्वांनी टाळ्या वाजविल्या. काहींनी जादू जादू ओरडत चांगली दाद दिली.

मुलांच्या टाळ्या आणि गोंधळ बघून मोठी माणसेही तेथे गोळा झालीत आणि काय जादू झाली ते बघायला लागली. मात्र जगतने सर्वांना शांत केले आणि तो म्हणाला,‘‘ यात जादू वगैरे अजिबात नाही, या मागे विज्ञान आहे. खरे तर व्हिनेगर एक ऍसिड आहे आणि मीठ व्हिनेगर सोबत प्रक्रिया करते तेव्हा नाण्यांवरील कॉपर ऑक्साईड काढून टाकते, त्यामुळेच नाणी स्वच्छ होतात.’’ जगतचे म्हणणे सर्वांना पटले. तेथून जाण्याअगोदर नाणी स्वच्छ करण्याची कृती जगतने सर्वांना पुन्हा नीट समजावून सांगितली.

आणि हो, नाण्यांचे हे प्रदर्शन नंतर सर्वांना आवडले आणि पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनले.

जुनी नाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती | Methods of cleaning old coins

जुन्या नाण्यांची साफसफाई करणे फार अवघड नाही, मात्र  विशेषत: ऐतिहासिक किंवा संग्राहक मूल्य असलेल्या नाण्यांना स्वच्छ करतांना सावधगिरी बाळगावी. जर तुमच्याकडे जुनी नाणी असतील जी तुम्हाला चमकदार बनवायची असतील तर वर सांगितलेली पद्धत तर उत्तम आहेच, त्याशिवाय खालील पद्धतींचा विचार करा:

  1. उबदार साबण पाणी:  एक ग्लास कोमट पाण्याने भरा आणि थोडासा सौम्य डिश साबण घाला. नाणी साबणाच्या पाण्यात हळूवारपणे बुडवा आणि त्यांना काही मिनिटे भिजू  द्या. स्वच्छ करण्यासाठी नाणी हलके घासण्यासाठी मऊ टूथब्रश किंवा कापूस पुसण्यासाठी वापरा. नंतर नाणी पाण्याने स्वच्छ धुवा आणि मऊ कापडाने पुसा. 
  2. ऑलिव्ह ऑइल बाथ: ऑलिव्ह ऑइलच्या एका लहान भांड्यात नाणी बुडवा आणि त्यांना काही तास भिजू द्या. यामुळे नाण्यांवर चिकटलेली घाण बाहेर निघते. नंतर नाणी स्वच्छ करण्यासाठी  मऊ कापडाने नाणी हळूवारपणे पुसून टाका.
  3. बेकिंग सोडा पेस्ट:  बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. मऊ टूथब्रश किंवा कापूसने नाण्यांवर ही पेस्ट लावा. नाण्यांवर ज्या ठिकाणी साफसफाईची आवश्यकता आहे त्या ठिकाणी लक्ष देऊन नाणी हळूवारपणे घासून घ्या. नंतर नाणी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि मऊ कापडाने वाळवा.
  4. एसीटोन (Acetone) (तांबे नसलेल्या नाण्यांसाठी):  ही पद्धत तांबे किंवा कांस्य नाण्यांसाठी वापरू नये. या पद्धतीत तांबे नसलेली नाणी स्वच्छ करण्यासाठी एसीटोनचा वापर केला जातो. नाणी एसीटोनमध्ये थोड्या काळासाठी भिजवा, नंतर मऊ टूथब्रशने हळूवारपणे घासून घ्या. नाणी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि कोरडी करा.
  5. क्लिनर सोल्यूशन: जड डागांसाठी नाणी चमकदार बनविण्यासाठी क्लिनर सोल्युशन दुकानात मिळते. हे क्लिनर सोल्यूशन वापरताना लॅटेक्स ग्लोव्हज आणि सुरक्षा चष्मा घाला, कारण ते खूप अम्लीय असू शकते. नंतर प्रत्येक नाणे साफसफाईच्या द्रावणात सुमारे 5 सेकंद बुडवा, नंतर अवशेष स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा.
  6. केचप पद्धत: केचपमधील ऍसिड्स चांदी आणि तांब्याच्या नाण्यांवरील डाग विरघळण्यास मदत करतात. यासाठी नाणी केचपमध्ये काही मिनिटे बुडवा. नंतर नाणी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि मऊ कापडाने वाळवा.
  7. नाणक शास्त्रज्ञांचा (numismatist) सल्ला- तुमच्याकडे फार फार मौल्यवान किंवा दुर्मिळ नाणी असल्यास, कोणतीही साफसफाई करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी व्यावसायिक शास्त्रज्ञांचा (numismatist) सल्ला घ्या. ते नाण्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यांवर आधारित नाणी स्वच्छ करण्यासाठी मार्गदर्शन देऊ शकतात.

निष्कर्ष ( Conclusion)-

जूनी नाणी गोळा करणे हा उत्तम छंद. पण जूनी नाणी अर्थातच जूनीच असतात. अशी ऐतिहासिक नाणी काळसर दिसतात. या नाण्यांना स्वच्छ आणि चकचकीत कसे करायचे, हे जगतने फारच सोप्या पद्धतीने वैज्ञानिक दृष्टीकोनातून पटवून दिले आहे. हे फार कठीण नाही. आपल्याकडे जुनी नाणी असल्यास आपणही वरील प्रयोग करू शकतात. एकंदर सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाणी जमा करणे हा एक उत्तम छंद  असला तरी त्यासाठी आपण मिळेल तशी नाणी जमा करतो. त्यातील बरीच नाणी काळसर  आणि जुनाट असतात. ही नाणी वरील पद्धतीने चकाकदार केल्यास हा छंद अधिक आकर्षक ठरू शकतो. स्वछता महत्वाची असलीतरी नाणे संग्राहक सहसा नाण्यांच्या नैसर्गिक, अस्वच्छ स्थितीत नाणी पसंत करतात. म्हणून आपणाकडे फार जुनी आणि मौल्यवान नाणी असल्यास कोणत्याही साफसफाईचा प्रयत्न करण्यापूर्वी व्यावसायिक सल्ला घ्या. 

Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने