सौर ऊर्जा म्हणजे रंगांना प्रकाशाची संवेदना | Solar energy is the sensation of colors to light

Solar energy is the sensation of colors to light
Solar-Energy

सौर ऊर्जा म्हणजे रंगांना प्रकाशाची संवेदना

Solar energy is the sensation of colors to light

 फोटोव्होल्टेइक सेल किंवा सोलर थर्मल कलेक्टर्स वापरून सूर्यापासून सौर ऊर्जेचा वापर केला जातो. हा एक अक्षय आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोत आहे जो वीज किंवा उष्णता निर्माण करतो. फोटोव्होल्टेइक सेल सूर्यप्रकाश थेट विजेमध्ये रूपांतरित करतात, तर सौर थर्मल कलेक्टर्स निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी पाणी किंवा हवा गरम करण्यासाठी सूर्यप्रकाश वापरतात. सौर ऊर्जा जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करते, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करते आणि ऊर्जा स्वातंत्र्य देते, ज्यामुळे ती जागतिक स्तरावर शाश्वत ऊर्जा प्रणालींचा एक प्रमुख घटक बनते.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • भिंतींना बाहेरून पांढरा रंग 
  • काळ्या रंगामुळे जास्त उष्णतेचे शोषण
  • सौर ऊर्जेचे महत्त्व 
  • निष्कर्ष

एकाचजागी खेळून अपार्टमेंटमधील सर्व मुले कंटाळली आज कुठेतरी बाहेर जाऊन खेळू असे सर्वांनी ठरविले. जगतने त्याचा मित्र जयेशच्या घरी खेळायचे सुचविले. सर्वांनी मान्य केले. जयेशचे जवळच घर होते. सर्व मुले त्याच्या घरी पोहोचली. पण त्याच्या घरी वेगळाच कार्यक्रम सुरू होता. काही लोक तेथे गोळा झाली होती आणि रंगांच्या डब्यातून रंग काढून तो बादलीत भरत होती, तर काहीजणांनी रंग देण्यासही सुरूवात केली होती. आज जयेशच्या घरी खेळायला मिळणार नाही या विचाराने सर्व मुले नाराज झाली, मात्र जगत त्यांना म्हणाला,‘‘ खेळणेतर रोजचेच आहे, आज आपल्याला काहीतरी नवे बघायला मिळतेय याचा विचार करा.’’

जमलेली मित्रमंडळी बघून जयेश आला, त्याने सर्वांचे स्वागत केले. जयेशच्या वडीलांनी सर्व मुलांना खाऊ देण्याचे जयेशच्या आईला सांगितले. सर्वांशी हाय-हलो झाल्यावर जगत जयेशला म्हणाला,‘‘अरे जयेश रंगकाम? अचानक कसे?’’

भिंतींना बाहेरून पांढरा रंग 

जयेश काही उत्तर देण्याच्या ऐवजी त्याचे वडील म्हणाले,‘‘ सद्याचा उन्हाळा तुम्ही अनुभवतच असाल. या उन्हाळ्यामध्ये गच्ची आणि घराच्या भिंती एवढ्या तापतात की रात्री दोन वाजेपर्यंत घरातला उकाडा काही कमी होत नाही. कुलर-पंखे सुद्धा त्या उकाड्यापुढे तोकडे पडतात. म्हणून आम्ही घराच्या भिंतींना बाहेरून आणि गच्चीलासुद्धा हा विशिष्ट असा पांढरा रंग देत आहोत. त्यामुळे घराचे तापमान निश्‍चितच दोन किंवा तीन अंश सेल्सियनने कमी राहील’’

काळ्या रंगामुळे जास्त उष्णतेचे शोषण | Black color absorbs more heat

जयेशच्या वडीलांचे हे स्पष्टीकरण जगतला पटले मात्र इतरांना काही पटले नाही. शरदने प्रश्‍न विचारला की केवळ पांढरा रंग दिल्यामुळे तापमानात कसा काय फरक पडेल.सर्वांनी याबाबत कुजबुज सुरू केली. हे बघून जयेशचे वडील म्हणाले‘‘मी जरा रंगकामात व्यस्त आहे, तुमच्या प्रश्‍नाचे उत्तर हा जगतच योग्य प्रकारे देऊ शकेल,त्याच्या विज्ञानाच्या ज्ञानाबाबत मी बरेच ऐकले आहे, नाही का जगत?’’

‘‘अगदी बरोबर काका! या प्रश्‍नाचे उत्तर मी अगदी प्रात्यक्षिकाद्वारेच सर्वांना समजावून सांगतो, तुम्ही रंगकामावर लक्ष ठेवा मी मुलांकडे बघतो.’’ असे जगतने म्हटल्यावर जयेशचे वडील तेथून निघून गेले. विज्ञानाचे प्रात्यक्षिक बघायला मिळेल या कल्पनेने जयेशसोबत सर्वांना आनंद झाला. तेवढ्यात जयेशच्या आईने सर्वांसाठी खाऊ आणला. सर्व जण आनंदात खाऊ खात असतांना जगत जयेशच्या कानात काहीतरी कुजबुजला. ते ऐकून जयेश तेथून निघून गेला आणि थोड्यावेळाने काहीतरी साहित्य घेऊन परत आला. सर्व मुले जगतपुढे गोळा झालीत. सर्व प्रथम जयेशने आणलेले साहित्य जगतने सर्वांना दाखविले. त्यात प्रामुख्याने दोन स्टेनलेस स्टिलचे ग्लास, एक तापमापक, काळा आणि पांढरा कागद आणि रबर बॅण्डचा समावेश होतो. जगतने एका ग्लासाभोवती बाहेरून पांढरा आणि दुसर्‍या ग्लासाला काळा कागद गुंडाळला आणि त्यावर रबरबॅण्ड लावले की जेणेकरून कागद योग्य जागेवरच स्थिर राहतील.नंतर त्या ग्लासांमध्ये पाणी ओतले आणि ते ग्लास जगतने एका ट्रे मध्ये ठेऊन तो ट्रे बाहेर उन्हात ठेवला आणि एका तास वाट बघण्याचे सांगितले. तोपर्यंत जयेशने त्याचे लहानपणीचे फोटो, त्याची चित्रकला वही आणि इलेक्ट्रॉनिक्स खेळणी सर्वांना दाखविली. हे बघण्यात मुले एवढी रंगून गेली की एक तास केव्हा संपला त्यांना कळलेच नाही. 

नंतर जगतने ट्रे घरात आणला आणि दोन्ही ग्लासमधील पाण्याचे तापमान तापमापकच्या सहाय्याने मोजले आणि काळ्या ग्लासमधील तापमान जास्त असल्याचे सर्वांना सांगितले. हे तापमान जास्त असल्याचे आपल्याला त्वचेलाही जाणवते, असे म्हणत जगतने ग्लासमध्ये बोटे टाकून सर्वांना सांगितले. नंतर जगत सर्वांना म्हणाला,

‘‘काळा रंग जास्त सूर्यप्रकाश आणि उष्णता शोषतो त्यामुळे काळ्या रंगाचा कागद गुंडाळलेल्या ग्लासातील तापमान पांढरा कागद गुंडाळलेल्या ग्लासापेक्षा जास्त भरले. हेचे तत्त्व सोलर शेगडी मध्ये वापरले जाते म्हणून सोलर शेगडीची आतील बाजू आणि त्यातील डबे हे काळे असतात. या उलट पांढरा रंग सूर्यप्रकाश कमी शोषतो आणि परावर्तित जास्त करतो, म्हणून आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे घातले पाहिजे. याच तत्त्वाचा आधार घेऊन जयेशचे वडील घराला पांढरा रंग देत आहेत. ’’ जगतचे स्पष्टीकरण सर्वांना पटले आणि त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तेवढ्यात जयेशच्या वडीलांचा अवाज ऐकू आला,‘‘कुणाला घराच्या पाठीमागील भिंतीला रंग लावायचा आहे का?’’ हे ऐकल्याबरोबर सर्व मुले धावली आणि आळीपाळीने त्यांनी ती भिंत रंगविण्यास सुरूवात केली. 

जगतने  सूर्यप्रकाश आणि त्याची रंगांना संवेदना हे तर उदाहरणासह स्पष्ट  केले. त्यासोबत जगतने सौर ऊर्जेचे महत्त्वही खालीलप्रमाणे सांगितले. 

सौर ऊर्जेचे महत्त्व । Importance of solar energy

नूतनीकरणयोग्य आणि शाश्वत: सौर ऊर्जा हा नवीकरणीय आणि अक्षय उर्जेचा स्रोत आहे. ही ऊर्जा सूर्यावर अवलंबून आहे, ज्याने अब्जावधी वर्षे ऊर्जा उत्सर्जित करणे सुरू ठेवणे अपेक्षित आहे. जीवाश्म इंधनाच्या विपरीत, सौर ऊर्जा नैसर्गिक संसाधने कमी करत नाही.

  • कमी झालेले हरितगृह वायू उत्सर्जन: सौर ऊर्जा निर्मितीमुळे कमीत कमी हरितगृह वायू उत्सर्जन होते, विशेषत: पारंपारिक जीवाश्म इंधनाच्या तुलनेत. सौरऊर्जेचा वापर करून, आपण हवामान बदलाचा प्रभाव कमी करू शकतो आणि आपला कार्बन फूटप्रिंट कमी करू शकतो.
  • ऊर्जा स्वातंत्र्य: सौर ऊर्जेमध्ये गुंतवणूक करणारे देश त्यांची ऊर्जा सुरक्षा वाढवू शकतात आणि जीवाश्म इंधन संसाधनांशी संबंधित भू-राजकीय तणावाची असुरक्षा कमी करू शकतात.
  • कमी ऑपरेटिंग खर्च: एकदा स्थापित केल्यावर, सौर उर्जा प्रणालींना पारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या तुलनेत कमी ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च येतो. यामुळे व्यक्ती आणि व्यवसाय दोन्हीसाठी दीर्घकालीन खर्च बचत होऊ शकते.
  • रोजगार निर्मिती: सौर ऊर्जा उद्योगात उत्पादन, प्रतिष्ठापन, देखभाल आणि संशोधनात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. नवीकरणीय ऊर्जेची मागणी जसजशी वाढत जाते, तसतशी सौर क्षेत्रात कुशल कामगारांची गरज भासते.
  • विकेंद्रित ऊर्जा निर्मिती: सौर पॅनेल विविध स्केलवर, वैयक्तिक घरांपासून मोठ्या प्रमाणात सौर शेतांपर्यंत तैनात केले जाऊ शकतात. वीज निर्मितीचा हा विकेंद्रित दृष्टीकोन ग्रीड निकामी करण्यासाठी लवचिकता वाढवू शकतो आणि दुर्गम किंवा कमी सुविधा नसलेल्या भागात विजेचा प्रवेश वाढवू शकतो.
  • तांत्रिक प्रगती: सौर तंत्रज्ञानामध्ये चालू असलेली प्रगती, जसे की सुधारित कार्यक्षमता आणि सौर पॅनेलची कमी होणारी किंमत, सौर ऊर्जा अधिकाधिक सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवते.
  • कमी झालेले वायू आणि जल प्रदूषण: सौर ऊर्जा निर्मिती ऑपरेशन दरम्यान हवा किंवा जल प्रदूषण निर्माण करत नाही. हे कोळसा आणि नैसर्गिक वायू सारख्या पारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या विरुद्ध आहे, जे वायू प्रदूषण आणि जल दूषित होण्यास हातभार लावू शकतात.
  • दीर्घकालीन व्यवहार्यता: तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे, सौर ऊर्जा अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर होत आहे. सौर पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक शाश्वत आणि विश्वासार्ह ऊर्जा भविष्यात योगदान देते.

एकूणच, सौरऊर्जेचे महत्त्व पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्याच्या, आर्थिक विकासाला चालना देण्याच्या आणि भविष्यासाठी स्वच्छ, शाश्वत ऊर्जा स्त्रोत प्रदान करण्याच्या क्षमतेमध्ये आहे.

निष्कर्ष ( Conclusion)-

सौर ऊर्जा म्हणजे सूर्याद्वारे उत्सर्जित होणारी तेजस्वी ऊर्जा होय. सौर ऊर्जेचे रूपांतर वापरता येण्याजोग्या उर्जेच्या विविध प्रकारांमध्ये केले जाऊ शकते. ही ऊर्जा विविध तंत्रज्ञानाद्वारे वीज, गरम पाणी आणि प्रकाश प्रदान करण्यासाठी वापरली जाऊ शकते. सौरऊर्जा पारंपारिक जीवाश्म इंधनासाठी स्वच्छ आणि टिकाऊ पर्याय मानली जाते, कारण ती कमीतकमी पर्यावरणीय प्रभाव निर्माण करते आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून हवामान बदल कमी करण्यास मदत करते. सूर्यप्रकाशाची विपुलता सौर उर्जेला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आणि नूतनीकरण करण्यायोग्य संसाधन बनवते आणि जागतिक ऊर्जा मिश्रणात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.

- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

----------------------------------------
हे सुद्धा वाचा- 
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने