स्वत:चे आर्थिक नियोजन करतांना.. | When planning your own finances

Plan your own finances
Planning your own finances

स्वत:चे आर्थिक नियोजन करतांना

आर्थिक नियोजन आपण संपूर्ण आयुष्य विचारात घेउन करतो का? नियोजन करायचेच झाल्यास बचत, गुंतवणूक, मुलांचे शिक्षण, विमा, रिटायर्मेंट, टॅक्स, कर्ज, पार्टटाईम जॉब या बाबीं कशा विचारात घ्याव्यात?आपल्या जीवनातील आर्थिक परिस्थिती प्रगतशील करण्यासाठी आर्थिक योजना विकसित झाली पाहिजे. आपल्या उद्दिष्टांचे नियमितपणे पुनर्मूल्यांकन करायला हवे आणि त्या प्रगतीचा मागोवा घ्यायला हवा. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • आर्थिक नियोजन नेमके कशाचे करावे?
  • आर्थिक पुर्तता
  • पैेशांची बचत म्हणजेच पेैशांचे उत्पन्न
  • पैशांची अप्रत्यक्ष गळती थांबवा
  • योग्य गुंतवणूक
  • कर्ज खरच जरूरी आहे का?
  • पार्टटाईम जॉब
  • विम्याचा विचार जरूर करा
  • मेडीक्लेम पॉलीसी जरूर असावी
  • कर भरण्याचे नियोजन
  • रिटायर्मेंटचा विचार
  • मृत्युपत्र 
  • निष्कर्ष

आर्थिक नियोजन नेमके कशाचे करावे? | What exactly is financial planning?

आर्थिक नियोजन करतांना ते नेमके कोणत्या कारणांसाठी करायचे ती कारणे निश्‍चित करा. या कारणांमध्ये कार खरेदी, घर खरेदी, मुलांचे शिक्षण, मुलांचे विवाह, स्वत:ची निवृत्ती retirement, आजारपण आदी बाबींचा समावेश होतो. ही कारणे केवळ विचारात न घेता प्रत्येक बाबीवर किती खर्च होऊ शकतो, त्याचा अंदाजही बांधणे आवश्यक असते. यासाठी आर्थिक नियोजनात निश्‍चित घडणार्‍या घटना आणि अनिश्‍चित घडणार्‍या घटना- जसे की आजारपण, सद्यस्थितीतील लॉकडाऊन lockdown अशा दोन्ही बाबींचा विचार असावा. 

आर्थिक पुर्तता | Financial fulfillment

आर्थिक नियोजन करण्याची कारणे निश्‍चित झाल्यावर त्याची पुर्तता कशी होऊ शकते, त्यावर लक्ष केंद्रीत करा. त्या कारणांसाठी पैसा कसा उभारला जाऊ शकतो, ते ठरवा. त्यासाठी सध्याच्या सर्व उत्पन्नाच्या स्त्रोतांची sources of income माहिती गोळा करा. उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आपले स्त्रोत पुरेसे नसल्यास एखादा पार्ट टाईम जॉब करण्याचा आपण विचार करू शकता. 

पैेशांची बचत म्हणजेच पेैशांचे उत्पन्न | Saving money means earning money

पैेशांची बचत म्हणजेच पेैशांचे उत्पन्न होय, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्या सर्व अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा. यात अनेक उदाहरणे देता येतील, जसे की- डीश टि.व्ही. चा प्लान व्यवस्थित निवडल्यास आणि बघितले न जाणारे चॅनेल्स channels बंद केल्यास दर महिन्याला थोडी का असोना, बचत होण्यास सुरूवात होते. तसेच फिरस्ती कमी केल्यास, थोड्या अंतरासाठी गाडी ऐवजी पायी गेल्यास, आठवड्याभरचा भाजीपाला थेट बाजारातून विकत घेतल्यास, घरातील काही कामे स्वत: केल्यास आदी आदी अशी अनेक प्रकारे आपली बचत money savings  होण्यास सुरू होऊ शकते. 

पैशांची अप्रत्यक्ष गळती थांबवा | Stop indirect leakage of money

पैशांची अप्रत्यक्षपणे होणारी गळती थांबविल्यासही उत्तम प्रकारे बचत होऊ शकते. जसे विजेचे बील हा अनावश्यक खर्च नसलातरी घरात सर्व ठिकाणी सीएफएल दिवे CFL bulbs आणि एनर्जी सेव्हींग उपकरणे Energy saving equipments वापरल्यास विजेचे बील सहजपणे निम्म्यावर आणता येते. 

योग्य गुंतवणूक | Right investment

योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ठराविक काळाने मिळणार्‍या पैशाचे नियोजन करता येते. परंतु विशिष्ट कालावधीने मिळणारा हा पैसा गरजेच्या वेळी खरोखरच उपयोगी ठरेल का, याचेही भान ठेवायला हवे. जसे पीएफ PF- Provident Fund मध्ये पैसा गुंतविल्यास तो किमान १५ वर्षांसाठी लॉक होतो. गरजेच्या वेळी यातील पैसा एका दिवसात काढता येत नाही. म्हणून गुंतवणूकीचे काही पर्याय असे असावेत की आपल्या त्यातून तातडीने पैसा urgent needs उपलब्ध होऊ शकेल.

कर्ज खरच जरूरी आहे का? | Is a loan necessary?

सहज मिळते म्हणून loan घेण्याचे जणू सध्या फॅडच निघाले आहे. तुम्हाला जर व्यवस्थित पगाराची नोकरी असेल, तर तुम्ही बँकेत कर्जाची चौकशी करायला सहज फोन करून बघा. तुम्हाला त्यांचे वारंवार फोन यायला सुरूवात होईल आणि कजे काढणे किती योग्य आहे हे सुद्धा ते लोक तुम्हाला पटवून देतील. जास्तीतजास्त प्रयत्न करा की कर्ज घेण्याची वेळच येऊ नये. गंमत म्हणून किंवा सहज मिळते म्हणून कर्ज अजिबात घेउ नका. कर्ज घ्यायची अगदी गंभीर गरज असेल तरच कर्ज काढा. ही कर्जाची रक्कम महिन्याच्या निव्वळ उत्पन्नाच्या ३० ते ४० टक्क्याहून अधिक व्हायला नको.

पार्टटाईम जॉब | Part time job

दरवर्षी महागाई वाढत आहे. आज आपण दर महिन्याला १५ हजाराची बचत करू शकत असू तर भविष्यात ती बचत महागाईमुळे केवळ दहा हजारावर येऊ शकते. म्हणून महागाईला तोंड देण्यासाठी आर्थिक नियोजनात तरतूद जरूर असावी. यासाठी पार्टटाईम जॉब ( Part time job) करणे, घरातील अन्य व्यक्तीलाही त्याची जबाबदारी सांभाळून जॉब करण्यास उद्युक्त करणे अशा पर्यायांचा जरूर विचार करा. 

विम्याचा विचार जरूर करा | Be sure to consider insurance

आपल्या मालमत्ता आणि अन्य स्थावर मालमत्तेला विम्याचे संरक्षण द्यावे. तसेच थकीत कर्जाबरोबर अन्य आर्थिक जबाबदार्‍यांनाही विम्याचे कवच ( Insurance cover ) असावे. असे विम्याचे हफ्ते भरतांना थेट फायदा दिसत नसलातरी संकटाच्या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई ( claim)  या विम्याद्वारे होउ शकते, हा विचार नेहमी मनात ठेवावा. 

मेडीक्लेम पॉलीसी जरूर असावी | There must be a mediclaim policy

आजारपण कधी सुरू होईल सांगता येत नाही. बरे तुम्ही शरीराची भरपूर काळजी घेतली, रोज व्यायाम, योगासन आणि प्राणायम नियमतिपणे केली तर तुमचे आजारपण तुम्ही बहुतांश पणे थांबवू शकता. पण अपघाताचे काय? अपघात निमंत्रण देऊन होत नाही ( Accidents do not happen by invitation ) आणि तुम्ही गाडी नियमानुसार चालविली तरी समोरच्याचे काय? अपघात आणि आजारपण तुमचा खिसा वेगात रिकाम करतात, केवळ खिसाच नाही तर काही आजारपण आणि अपघातांचे दवाखान्याचे बील तुमचे बँके खातेही रिकामे करते. या सार्‍या गोष्टींचा विचार करता मेडीक्लेम पॉलीसी ( Mediclaim Policy )  प्रत्येकाने स्वत:ची आणि संपूर्ण कुटूंबाची काढायलाच हवी.

कर भरण्याचे नियोजन | Tax payment planning

काही लोक केवळ कर ( Tax) भरणे टाळण्यासाठी अनावश्यक ठिकाणी गुंतवणूक करून नंतर पश्‍चाताप करतात. थोडासा टॅक्स वाचविण्यासाठी विशिष्ट अशी रक्कम आयुष्यभर खर्च करणे योग्य आहे का? यात आणखी एक भयानक प्रकार दिसतो, तो म्हणजे कर वाचविण्यासाठी कर्ज काढणे. अशा गोष्टी करण्या अगोदर कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा.

रिटायर्मेंटचा विचार | Retirement planning 

रिटायर्मेंटचा विचार करून त्यासाठी गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी. त्यासाठी खास रक्कम वेगळी ठेवावी. एकवेळ कार घेण्याचे, परदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न बाजूला ठेवता येईल, परंतु रिटायर्मेंटच्या लक्ष्यालाच ( retirement planning) प्राधान्य द्यावे.

मृत्युपत्र आवश्यक  | The will is important

सर्व आर्थिक नियोजन आपण स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबासाठी करत असतो. अशा कुटुंबासाठी आपण रोज धडपडत असतांना आपण अचानक एक्झीट घेतल्यास आपल्या संपत्तीवरून कुटुंबात कलह होउ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने मृत्युपत्र ( will ) करून ठेवणे गरजेचे आहे. आपल्या आजुबाजूला अशी अनेक उदाहरणे दिसतील की घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यावर त्याच्या कुटूंबात कशाप्रकारे आर्थिक कलह सुरू झाला आणि नंतर असे वाद कोर्टापर्यंत पोहोचले. म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर आपण नेमलेल्या वारसांना आपल्या संपत्तीचा अधिकार विना कलह मिळण्यासाठी मृत्युपत्र जरूर करून ठेवा.

निष्कर्ष ( Conclusion)-

आपल्या घरामध्ये विवाह किंवा बारशाचा किंवा असाच एखादा कार्यक्रम असल्यास आपण पाहुण्यांच्या स्वागतापासून ते भोजनापर्यंत सर्व नियोजन करतो. अशा कार्यक्रमासाठी पैशाचेही नियोजन करतो. असे नियोजन फक्त एक दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी किंवा महिनाभरासाठी असल्यामुळे ते सोपे जाते. परंतु असेच आर्थिक नियोजन आपण आपले संपूर्ण आयुष्य लक्षात घेऊन करतो का, असा प्रश्‍न विचारल्यास अभावानेच हो अशी काही उत्तरे ऐकायला मिळतील. मग असे आर्थिक नियोजन Financial planning करतांना कोणत्या बाबी विचारात घ्याव्या असा प्रश्‍न याबाबत बेफिकीर असलेल्यांना पडला असेल. अशा बेफिकीर लोकांसाठी हा लेख बरेच काही सांगून जातो. 

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

---------------------------------
हे सुद्धा वाचा-
Yogesh Ramakant Bholane

Director, Nikant Classes, Dhule | Contact: +91 9881307618. I am a passionate professional writer, crafting engaging articles on diverse topics like current affairs, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues for newspapers, magazines, and digital platforms. With over 20 years as a District-Level Trainer at the Maharashtra Centre for Entrepreneurship Development (MCED), I’ve delivered hundreds of training sessions, inspiring and guiding thousands of young entrepreneurs across Maharashtra. I’m also skilled in video editing, VFX, website development, and blogging, bringing creativity and technical expertise to every project. At Nikant Classes, we empower students with courses for Scholarship, NTS, MTS, Manthan, Jawahar Navodaya, and regular classes for State Board, CBSE, and ICSE.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने