प्रॉपर्टी खरेदी करतांना ही काळजी घ्या | Be careful when buying a property

Be careful when buying a property
property-buying

प्रॉपर्टी खरेदी करतांना ही काळजी घ्या

प्रॉपर्टी म्हणजेच घर, फ्लॅट किंवा प्लॉट ( Flat or Plot ) अशी मालमत्ता खरेदी करणे होय. पण अशी प्रॉपर्टीची खरेदी फायदेशीर आहे की नाही , यावर आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो . विशेष म्हणजे अशी प्रॉपर्टी विकत घेतेवेळी फक्त फायदेशीर मुद्देच विचारात घेतले जातात किंवा डीलर करून सांगितले जातात. परंतु अशी अनेक कारणे आहेत की तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करतांना विचारात घ्यायला हवीत. ही कारणे खालील प्रमाणे:

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • बाजारातील वाईट पत
  • उत्पन्नाची अनिश्‍चितता
  • अगोदरच कर्ज घेतलेले असल्यास
  • बजेट आणि परवडणारी क्षमता
  • बँकांची नवीन योजना
  • प्रॉपर्टीची जागा योग्य हवी
  • प्रॉपर्टीचे टायटल शंकास्पद असल्यास
  • सरकारी परवाने आहेत का?
  • प्रॉपर्टीवर अगोदरच कर्ज आहे का?
  • कनेक्टिव्हिटी
  • प्लाट की घर
  • कोणती मालमत्ता खरेदी करू नये
  • निष्कर्ष

बाजारातील वाईट पत | Bad credit in the market

पुरेसे मार्गदर्शन नसल्यामुळे सुरूवातीला अनेक लोक कसेही आर्थिक व्यवहार करतात, यामुळे त्यांची बाजारातील पत वाईट होते. बँका या पतबाबत क्रेडिट स्कोअर ( Credit score ) हा शब्द वापरतात. आपण घर खरेदीसाठी डाऊन पेमेंट रोख भरून इतर सर्व बाबी पूर्ण केल्या आणि कर्जासाठी बँकेत गेल्यास अशा ऐनवेळी बँक आपल्या खराब क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज नाकारू शकते. म्हणून आपला क्रेडिट स्कोअर सुधारेपर्यंत गृहकर्ज घेणे टाळा.

उत्पन्नाची अनिश्‍चितता | Income Uncertainty

अनेक खाजगी कंपनीतील नोकर्‍या या कायम स्वरूपाच्या नसतात किंवा केवळ काही वर्षांपूरती मर्यादित असतात. म्हणून सध्या जरी आपले मासिक उत्पन्न भरपूर असल्यास, परंतु भविष्यात नोकरीची निश्‍चितता नसल्यास कर्ज काढून घर खरेदी करणे टाळा.

अगोदरच कर्ज घेतलेले असल्यास | If already borrowed

सहज मिळते म्हणून काहींना कर्ज घेण्याचा मोह होतो. अगोदरच आपण कर्ज घेतलेले असेल आणि ते पूर्ण फेडण्याच्या आत आपण प्रॉपर्टी खरेदीसाठी कर्ज घेतल्यास आपली आर्थिक स्थिती कोलमडू शकते. म्हणून अगादेरचे कर्ज पूर्ण फेडल्याशिवाय प्रॉपर्टीसाठी नवीन कर्ज घेऊ नका.

बजेट आणि परवडणारी क्षमता | Budget and Affordability

तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित तुमचे बजेट आणि परवडणारी क्षमता ठरवा. केवळ मालमत्तेची किंमतच नाही तर कर, विमा, देखभाल आणि संभाव्य नूतनीकरण यासारख्या संबंधित खर्चाचाही विचार करा.

बँकांची नवीन योजना | New Banking Scheme 

दरवर्षी बँका गृहकर्ज पद्धतीत बदल करीत असतात. हे बदल अनेक स्वरूपाचे असू शकतात. म्हणून जर नजीकच्या काळात जर बँका गृहकर्जासाठी आकर्षक योजना सादर करीत असल्यास किंवा व्याजदराची कपात असल्यास तोपर्यंत आपण सध्याची घर खरेदी टाळून त्या योजनेची वाट बघण्यातच आपला फायदा आहे. म्हणजेच भविष्यातील आणि सद्याच्या योजनांवर लक्ष ठेवा.

प्रॉपर्टीची जागा योग्य हवी | Property space should be appropriate

अनेक लोक केवळ गुंतवणूक म्हणून प्रॉपर्टी खरेदी करतात. म्हणजेच भविष्यात अशी प्रॉपर्टी भाव वाढल्यावर विकता येऊ शकेल. परंतु किंमती किती पट वाढतील यालाही मर्यादा असतात. सुरूवातीलाच आपण खूप चढ्याभावात प्रॉपर्टी खरेदी केल्यावर त्याचे हफ्ते फेडता फेडता कितीतरी पट रक्कम आपण अगोदरच चुकती केलेली असते. भविष्यात अशा प्रॉपर्टीची किंमत आपल्या अपेक्षे प्रमाणे न वाढल्यास आपल्याला खूप मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून प्रॉपर्टीच्या भविष्यातील किंमतीविषयी शाश्‍वती नसल्यास केवळ गुंतवणूक म्हणून अशी प्रॉपर्टी घेणे टाळलेलेच बरे. 

स्थान: Location

तुमच्या गरजा आणि प्राधान्ये पूर्ण करणारे स्थान निवडा. विचारात घेण्याच्या घटकांमध्ये कार्यक्षेत्र, शाळा, सार्वजनिक वाहतूक, खरेदी केंद्रे, आरोग्य सुविधा आणि मनोरंजन क्षेत्रे यांचा समावेश होतो.

कायदेशीर बाबी तपासा : Check Legal Matters

मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबी तपासा. यात जरादेखील दुर्लक्ष करू नका. मालमत्तेचे टायटल, मालकी आणि कोणतेही विद्यमान भार किंवा कायदेशीर समस्या तपासूनच घ्या. सुरळीत आणि कायदेशीर व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी कायदेशीर व्यावसायिकांशी किंवा वकीलांशी सल्लामसलत करा.

प्रॉपर्टीचे टायटल शंकास्पद असल्यास | If the title of the property is in doubt

खरेदीकरण्यापूर्वी प्रॉपर्टी नेमकी कोणाच्या नावावर आहे म्हणजेच तिचे टायटल कोणाकडे आहे, ही बाब स्पष्ट असायला हवी. म्हणून प्रॉपर्टी खरेदी करण्याअगोदर आपण सर्व कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्या प्रॉपर्टीवर कोर्टात दावा सुरू असल्यास, प्रॉपर्टी दुसर्‍याच व्यक्तीच्या नावावर असल्यास किंवा प्रॉपर्टीच्या टायटलबाबत आपणास जराही शंका असल्यास आपण अशा प्रॉपर्टीची खरेदी टाळायला हवी.

लपलेले खर्च | Hidden costs:

मालमत्ता कर, घरमालकांची असोसिएशन फी, उपयुक्तता खर्च आणि देखभाल खर्च यासारख्या मालमत्ता खरेदीशी संबंधित छुप्या खर्चांबद्दल जागरूक रहा. त्या सर्व खर्चाची अगोदरच माहिती घ्या. 

सरकारी परवाने आहेत का? | Are there government licenses?

फ्लॅट खरेदीवेळी बिल्डरकडे सरकारी परवानग्या आहेत का, ही बाब तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजेच बिल्डरकडे बांधकाम सुरु करण्याचे, बांधकाम पूर्ण करण्याचे, ना हरकत दाखला, प्रॉपर्टी लेआऊट, इत्यादी कागदपत्र आहेत का, याची माहिती घेणे आवश्यक आहे. याबाबत एक तरी अपूर्णता आढळल्यास किंवा परवानगी नसल्यास आपण ही खरेदी ताबडतोब थांबवायला हवी.

प्रॉपर्टीवर अगोदरच कर्ज आहे का? | Is the property already in debt?

अगोदरच कर्ज असलेली प्रॉपर्टी आपण खरेदी केल्यास पुढे त्या प्रॉपर्टीवरचे कर्ज आपणाला फेडावे लागू शकते. अशा अनेक घटना अगोदर घडलेल्या आहेत. आपणास खरेदी करावयाची प्रॉपर्टीवर अगोदरच कर्ज आहे का ही बाब आवर्जून तपासायला हवी. याबाबत खात्री नसल्यास अशी खरेदी पुढे ढकलणेच आपल्या हिताचे राहील.

कनेक्टिव्हिटी | Connectivity 

कनेक्टिव्हिटी म्हणजेच सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता. म्हणजे खरेदी करावयाची मालमत्ता ही मुख्य रस्ता, बस स्टॅण्ड, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळ अशा महत्वाच्या ठिकाणांपासून जवळ असणे अधिक फायदेशीर असते. असे नसल्यास प्रॉपर्टी पुन्हा विकताना अपेक्षित किंमत मिळणे मुश्किल होईल.

प्लाट की घर | Plot or readymade home

खरे तर जमिनीत गुंतवणूक करतांना प्लॉट घ्यायचा की रेडीमेड घर घ्यायचे या संम्रभात गुंतवणूकदार अडकतात. कालानुरूप जमिनीची किंमत वाढत जाते, तर घराची किंमत कमी होत जाते. रिकामा प्लॉट हवा तसा खरेदीदाराला बांधता येत असल्यामुळे त्याची विक्री पटकन होते. परंतु घर विकतांना त्याच्या बांधकामाचा दर्जा, देखभाल, बांधकाम योजना, रंगरंगोटी आदी बाबींचा विचार खरेदीदार करतो. णून तुमची जीवनशैली आणि गरजा पूर्ण करणार्‍या मालमत्तेचा प्रकार ठरवा. या पर्यायांमध्ये छोटी घरे, कॉन्डोमिनियम, टाउनहाऊस, अपार्टमेंट किंवा व्यावसायिक मालमत्ता समाविष्ट आहेत.

मालमत्तेची स्थिती: Property Status

तयार बांधलेले घर किंवा व्यावसायिक गाळा विकत घेतांना पाया, छप्पर, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि एकूण देखभाल यासह मालमत्तेच्या स्थितीचे मूल्यांकन करा. संभाव्य नूतनीकरण किंवा दुरुस्ती खर्चातील घटक विचारात घ्या. 

वाटाघाटी कौशल्ये वापरा | Use negotiation skills:

मालमत्तेचा करार आपल्या मनाजोगा करण्यासाठी प्रभावी वाटाघाटी कौशल्ये विकसित करा. विक्रेत्याशी किंमत, अटी आणि शर्तींवर बोलणी करण्यास तयार रहा. 

पर्यावरणाचे घटक | Environmental Factors:

खरेदी करायच्या मालमत्तेच्या ठिकाणासंबंधी पर्यावरणीय घटकांचा विचार करा, जसे की नैसर्गिक आपत्ती, पूर क्षेत्रे, भूकंपाची क्रिया किंवा इतर संबंधित धोके तपासा.

वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा  |  Personal and family needs:

मालमत्ता स्वतःसाठी घ्यावयाची असल्यास मालमत्ता निवडताना आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा, वर्तमान आणि भविष्यकाळ या दोन्हींचा विचार करा. कौटुंबिक आकार, जीवनशैली किंवा कामाच्या व्यवस्थेतील संभाव्य बदलांचा विचार करा. मात्र मालमत्ता केवळ गुंतवणूक म्हणून घ्यावयाची असल्यास भौगोलिक स्थिती, भविष्यातील किमती इत्यादी बाबी तपासा. 

कोणती मालमत्ता खरेदी करू नये?  | Which property not to buy?

कोणती मालमत्ता खरेदी करायची नाही हे ठरवणे योग्य मालमत्ता निवडण्याइतकेच महत्त्वाचे आहे. मालमत्ता तुमच्या गरजांसाठी योग्य नाही किंवा संभाव्य समस्या निर्माण करू शकते हे ठरवताना खालील घटक विचारात घ्या 

  • अवास्तव किंमत:  ज्या मालमत्तेची किंमत बाजार मूल्यापेक्षा जास्त आहे त्यापासून सावध रहा. मालमत्तेसाठी जास्त पैसे दिल्याने आर्थिक आव्हाने आणि पुनर्विक्रीमध्ये अडचणी येऊ शकतात.
  • आजूबाजूची स्थिती : उच्च गुन्हेगारी दर असलेली जागा मालमत्ता खरेदीसाठी निवडू नका. तसेच शाळा, कॉलेज, बाजार इत्यादी सुविधांचा अभाव असलेले जागाही निवडू नका.
  • पर्यावरणीय धोके: पूर क्षेत्र, भूकंपाचे क्षेत्र किंवा उच्च प्रदूषण पातळी असलेले क्षेत्र यासारख्या पर्यावरणीय धोक्यांना प्रवण असलेल्या भागात मालमत्ता खरेदी करू नका. 
  • टायटल क्लिअर नसल्यास : अस्पष्ट किंवा विवादित टायटल असलेल्या बाबींमुळे कायदेशीर गुंतागुंत होऊ शकते. कोणतीही थकबाकी किंवा विवाद असलेली मालमत्ता खरेदी करण्याचे टाळा.  
  • आवाज आणि पर्यावरणीय घटक: गोंगाटयुक्त महामार्ग, विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे किंवा पर्यावरणीय गडबड करणाऱ्या इतर स्त्रोतांजवळील मालमत्ता खरेदीकरण्यापूर्वी खूप विचार करा.

निष्कर्ष ( Conclusion)-

प्रॉपर्टी खरेदीकरतेवेळी खालीलपैकी कोणतिही बाब आढळल्यास आपण प्रॉपर्टी खरेदी करतांना दक्ष राहवयास हवे.
अ) बिल्डर जर सर्व रक्कम रोख स्वरूपात मागत असेल.
ब) खरेदीकरतेवेळी प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्र उपलब्ध नसल्यास
क) खरेदीचे कागदपत्र स्टॅम्पपेपरवर असण्याऐवजी साध्या कागदांवर असल्यास.
ड) खरेदीवेळी मूळ मालक हजर नसल्यास.
ई) प्रॉपर्टीवर विकणार्‍याऐवजी दुसर्‍याच व्यक्तीचा अनधिकृत ताबा असल्यास.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, तुम्हाला मालमत्ता खरेदीच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ अनुभवी रिअल इस्टेट व्यावसायिकाचा सल्ला घ्या.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे

----------------------------------------
हे सुद्धा वाचा-
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने