एटीएम किती सुरक्षित? | How secure the ATM is?

How secure is your ATM
ATM machine

एटीएम किती सुरक्षित? 

बँकांकडून जागोजागी उभारण्यात आलेल्या एटीममुळे (ऑटोमेटेड टेलर मशीन्स) केव्हाही पैशाची उपलब्धता होत असली तरी दक्षता न घेतल्यास हे एटीएम आता असुरक्षित ठरू लागले आहेत. त्यासाठी एटीएम वापरतांना खालील बाबींची माहिती आपण घेतलीच पाहिजे...

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • एटीएम सुरक्षित असे आहेत 
  • दुसर्‍याची मदत टाळा
  • मॅग्नेटीक डोअर
  • दुकानात कार्डचा वापर
  • कार्डचे क्लोनिंगपासून सावधान
  • पॉईंट ऑफ सेल
  • संशयास्पद व्यक्ती
  • पीन वारंवार बदलत रहा
  • फोटो किंवा व्हिडीओ
  • फोनवरून चौकशी
  • निष्कर्ष

एटीएम सुरक्षित असे आहेत । ATMs are safe like this

ऑटोमेटेड टेलर मशीन्स (एटीएम) वापरकर्ते आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे संरक्षण करण्यासाठी विविध सुरक्षा वैशिष्ट्यांसह डिझाइन केलेले आहेत. एटीएमची सुरक्षा ही बँक संस्था आणि वापरकर्ते या दोघांसाठीही एक महत्त्वाची चिंता आहे. खालील मुद्दे विचारात घेता विशेष काळजी घेऊन एटीएम वापरण्यास काही हरकत नाही.एटीएमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी येथे काही प्रमुख सुरक्षा उपाय आहेत:
  • भौतिक सुरक्षा: एटीएम सुरक्षित ठिकाणी स्थापित केले जातात आणि मशिन्स स्वतः हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी तयार केल्या जातात. ते बर्‍याचदा प्रबलित केसिंग्ज, अँटी-स्किमिंग डिव्हाइसेस आणि छेडछाड-स्पष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज असतात.
  • एनक्रिप्शन: ATM आणि बँकेच्या सर्व्हरमधील संप्रेषण अनधिकृत प्रवेश आणि डेटा व्यत्यय टाळण्यासाठी एनक्रिप्टेड आहे. हे सुनिश्चित करते की संवेदनशील माहिती, जसे की पिन आणि खाते तपशील, व्यवहारादरम्यान सुरक्षित राहतील.
  • पिन संरक्षण: पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (पिन) चा वापर सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडतो. वापरकर्त्यांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी त्यांचे अद्वितीय पिन प्रविष्ट करणे आवश्यक आहे. अनाधिकृत प्रवेश टाळण्यासाठी पिन सामान्यत: कूटबद्ध (encrypted) आणि सुरक्षितपणे संग्रहित केला जातो.
  • कार्ड स्किमिंग प्रतिबंध: गुन्हेगारांना एटीएममध्ये स्किमिंग उपकरणे जोडण्यापासून रोखण्यासाठी अँटी स्किमिंग उपकरणे आणि तंत्रज्ञान लागू केले जातात. ही उपकरणे कार्ड माहिती आणि पिन कॅप्चर करू शकतात, ज्यामुळे खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश होतो.
  • कार्ड प्रमाणीकरण: कार्ड सुरक्षितता वाढवण्यासाठी EMV (Europay, MasterCard आणि Visa) तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. EMV चिप्स प्रत्येक वापरासाठी अद्वितीय व्यवहार कोड तयार करतात, ज्यामुळे गुन्हेगारांना कार्ड क्लोन करणे आणि फसवे व्यवहार करणे कठीण होते.
  • पाळत ठेवणारे कॅमेरे :Surveillance Cameras- मशीनच्या आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एटीएम पाळत ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. हे केवळ गुन्हेगारी क्रियाकलापांना प्रतिबंधित करत नाही तर कोणत्याही संशयास्पद वर्तनाची नोंद देखील प्रदान करते.
  • व्यवहार कालबाह्य: Transaction Expiration-अनधिकृत प्रवेश आणि संभाव्य कार्ड चोरी टाळण्यासाठी, एटीएममध्ये व्यवहार कालबाह्य आहेत. जर एखाद्या वापरकर्त्याने निर्दिष्ट वेळेत व्यवहार पूर्ण केला नाही, तर सत्र समाप्त केले जाईल.
  • रिमोट मॉनिटरिंग: वित्तीय संस्था असामान्य किंवा संशयास्पद क्रियाकलापांसाठी एटीएमचे दूरस्थपणे निरीक्षण करतात. कोणतीही विसंगती अलर्ट ट्रिगर करू शकते आणि पुढील तपासणीसाठी एटीएम तात्पुरते ऑफलाइन किंवा फ्लॅग केले जाऊ शकते.
  • नियमित देखभाल आणि तपासणी:- वित्तीय संस्था एटीएमचे योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी आणि संभाव्य सुरक्षा भेद्यता ओळखण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल आणि तपासणी करतात.
  • एटीएम स्किमिंग शिक्षण:- एटीएम स्किमिंगबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि वापरकर्ते स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात यावरील टिपा प्रदान करण्यासाठी वित्तीय संस्था अनेकदा सार्वजनिक शैक्षणिक मोहिमांमध्ये व्यस्त असतात, जसे की पिन प्रविष्ट करताना कीपॅड झाकणे.

एटीएममध्ये मजबूत सुरक्षा उपाय असले तरी, वापरकर्ते त्यांच्या व्यवहारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. वापरकर्त्यांनी सतर्क राहणे, त्यांच्या पिनचे संरक्षण करणे, त्यांचे खाते विवरण नियमितपणे तपासणे आणि कोणत्याही संशयास्पद क्रियाकलापाची त्यांच्या बँकेला त्वरित तक्रार करणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त, खालील मुद्दे विचारात घेऊन कुणीही एटीएमचा सुरक्षित वापर करू शकतात. 

एटीएम वापरतांना घ्यावयाची काळजी | Precautions to be taken while using ATM

दुसर्‍याची मदत टाळा | Avoid help of others

एटीएम वापरतांना जराही समस्या आली तर आपण लगेच तेथे उपलब्ध असलेल्या माणसाला मदत मागतो. असे लोक आपल्याला मदत तर करतात पण आपले एटीएम कार्ड परत देतांना ते बदलवितात आणि आपल्या कार्डद्वारे पैसे काढून घेतात.अशा प्रकारच्या घटना तर आणि नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे एटीएम मशीन कसे वापरायचे हे ओळखीच्या व्यक्तीकडून शिकून घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत अनोळखी माणसाची मदत टाळा.

मॅग्नेटीक डोअर | Magnetic Door

काही एटीएम सेंटरवर एटीएमचे दार उघडण्यासाठी बाहेरच्या बाजूने क्रेडिट/डेबिट कार्ड स्वॅप करण्याची सुविधा (मॅग्नेटीक डोअर प्रणाली) असते. जेणेकरून कार्ड स्वॅप केल्यावरच दार उघडू शकेल आणि खातेदार आत गेल्यावर दार ऑटोमॅटिक लॉक होईल. तसेच एटीएम मशीन हाताळल्यानंतर बाहेर पडण्यासाठी दाराजवळ एक मोठे बटण असतेे, म्हणजे हे बटण दाबल्यानंतरच दार उघडेल. या सुविधेमुळे एटीएम मशीन हाताळेपर्यंत बाहेरील व्यक्ती आता येऊ शकणार नाही. अशा एटीम सेंटरमधून पैसे काढणे सुरक्षित असते. काही बँकांनी अशी सुविधा त्यांच्या एटीएम मशीनला पुरविलेली असली तरी परंतु ती नेहमी खराबच असतांना आढळते. 

दुकानात कार्डचा वापर  | Using the card in the shop

विश्वसनीय आणि प्रमाणित व्यापार्‍याकडेच आपल्या कार्डचा वापर करा. कार्ड स्वाईप करण्याकरिता वेगळ्या दुकानात किंवा खोलीत कार्ड घेऊन जायची परवानगी संबंधित दुकानदाराला देऊ नका. तसेच व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत आणून देण्यात आलेले कार्ड तुमचेच आहे याची खात्री करून घ्या.

कार्डचे क्लोनिंगपासून सावधान | Beware of card cloning

एटीएम मशीनमध्ये कार्ड सरकवण्याच्या खाचेवरच लोहचुंबकाप्रमाणे एक यंत्र बसवण्यात येते. हे यंत्र मशीनला घट्ट चिकटून तो मशीनचाच एक भाग असल्यासारखे वाटते. या यंत्रातून कार्ड एटीएम मशीनमधून जात असतांना त्यातील माहिती कॉपी होते. ही माहिती त्यानंतर डुप्लिकेट कार्डमध्ये घालून ती कार्ड वापरली जातात. काही ठिकाणी अशा घटना घडल्याची उदाहरणे आहेत. हे टाळण्यासाठी आता बँकांनी नव्या प्रकारची एटीएम कार्ड देणे सुरू केले आहेत, त्यावरील माहिती वरील प्रकारे गैरमार्गाने कॉपी करता येत नाही. या प्रकाराला आता एटीएम कार्डचे क्लोनिंग असे संबाधले जात आहे.

पॉईंट ऑ सेल | Point of sale

व्यापारी पीओएस (पॉईंट ऑफ सेल) मशिनमध्ये कार्ड स्वाईप करतांना खबरदारी बाळगा. येथे कार्डचा पिन स्वत:हून टाका. दुसर्‍याची मदत घेऊ नका.

संशयास्पद व्यक्ती | Suspicious person

एटीएम सेंटरच्या सभोवताली संशयास्पद व्यक्ती वावरत असणार्‍या किंवा असुरक्षित भासणार्‍या एटीएम सेंटरचा वापर करणे टाळा.

पीन वारंवार बदलत रहा | Keep changing pins frequently

एटीएम कार्डचा पीन वारंवारबदलण्याचा सल्ला तर बँकेमार्फतही मिळत असतो. हे फार महत्त्वाचे आहे आणि फार सोपे देखील आहे. पीन कसा बदलायचा हे बँकेमार्फत शिकून घ्या.

फोटो किंवा व्हिडीओ | Photo or Video shooting

 आपल्याला कल्पना असेलच की आपल्या कार्डवरील क्रमांक आणि आपला पीन जर त्रयस्थ व्यक्तीला माहीत पडला तर कार्ड जरी त्याकडे नसले तरी तो त्या कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करू शकतो. म्हणून आपल्या कार्डचा क्रमांक आणि पीन कुणालाही सांगू नका, दाखवू नका. अनेक वेळा आपण एटीम केंद्रातून व्यवहार करतांना त्रयस्थ व्यक्ती मागून आपला फोटो काढू शकतो किंवा व्हीडीओ शुटींग करू शकतो, त्याद्वारे तो आपल्या कार्डवरील क्रमांकाचा आणि पीनचा अंदाज घेऊ शकतो. म्हणून आपले कार्ड कुणालाही पटकन दिसेल असे हाताळू नका आणि पीन टाकतांना दुसर्‍या हाताने कीबोर्ड झाका.

फोनवरून चौकशी | Inquiries over the phone

आपले एटीएम कार्ड अपडेट करायचे आहे, ते बंद पडले आहे या प्रकारे वेगवेगळी कारणे सांगून सायबर गुन्हेगार आपल्याला कार्डची माहिती विचारतात आणि आपण पटकन सांगून टाकतो. असे अजिबात करू नका. कार्ड बाबत बँकेचे लोक कधीही फोनवरून संभाषण करीत नाही.

निष्कर्ष ( Conclusion)-

एटीएमचे अनेक उपयोग आहेत, पण एटीएम वापरतांना जरासुद्धा दुर्लक्ष्य झाल्यास फार मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून एटीएम वापरकर्त्याने वरील सर्व सूचनांचे आणि बँकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. 

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

Image source-man-in-blue-polo-shirt-standing-inside-an-atm-booth-3652781 Photo by Alexandros Chatzidimos from Pexels

एटीएम किती सुरक्षित? | How secure the ATM is? एटीएम किती सुरक्षित? | How secure the ATM is? Reviewed by Yogesh Ramakant Bholane on जुलै ०१, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.