गुणकारी झेंडू | Marigold Health Benefits

Marigold Health Benefits
Marigold Health Benefits

गुणकारी झेंडू

दसरा आणि दिवाळीला धार्मिक कार्यासाठी झेंडूची फुले आपण आवर्जून वापरतो. पण झेंडूच्या फुलांचे आरोग्याच्या दृष्टीने उपयोग बघून तुम्ही थक्क व्हाल. इतके उपयोग ते पण झेंडूचे आणि आपण फक्त पुजेलाच उपयुक्त समजत होतो. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • सणांमध्ये झेंडूच्या फुलांचे महत्त्व
  • आयुर्वेद आणि झेंडू
  • झेंडूच्या पानांचा उपयोग
  • झेंडूच्या फुलांचा उपयोग
  • कॅलेंड्यूला
  • झेंडूच्या फुलांचा चहा
  • झेंडूच्या फुलांचा रस
  • उत्तम त्वचेसाठी झेंडू
  • मुळव्याधीवर झेंडूच्या फुलांचा रस उपयुक्त
  • मूत्रविकारात उपयुक्त झेंडू
  • दातांच्या विकारावर झेंडूच्या पानांची पेस्ट
  • दमा, श्‍वसनाच्या आजारांवर झेंडू उपयुक्त
  • लचक आणि सूज
  • ऍण्टीरिपेलन्ट
  • इतर उपयोग
  • निष्कर्ष

सणांमध्ये झेंडूच्या फुलांचे महत्त्व | Significance of marigold flowers in festivals

दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाला झेंडूच्या फुलांची दसरा आणि दिवाळीला आठवण येते. दसऱ्याला तर झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व असते. देवपूजेसमवेत शस्त्रपूजा, आयुधपुजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वाराच्या पूजेसाठी, सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो. झेंडूच्या पिवळ्या रंगामुळेही ते खास बनले आहे. त्या पिवळ्या रंगामुळे जणूकाही ते पिवळे सोनेच आहे, असा भास होतो. या कारणामुळेही या फुलाला हिरण्यगर्भ पुष्प Hiranyagarbha flower असे म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं ( gold) आणि त्याच्या रंगासाखे फुल म्हणजे झेंडू, म्हणून झेंडूच्या फुलाला हिरण्यगर्भ पुष्प हे नाव पडले असावे. पण झेंडूची फुले केवळ पिवळ्या रंगाचीच असतात असे नव्हे. झेंडूची फुले पिवळ्या रंगांच्या विविध छटांसोबत, लाल, केशरी, नारिंगी अशा विविध रंगछटांमध्ये उपलब्ध होतात. तसेच झेंडूच्या पाकळ्याही वैशिष्ट्यपूर्ण असतात. या पाकळ्या लहान-मोठ्या, अणकुचीदार, पसरट अशा विविध नैसर्गिक स्वरूपात आढळतात. तसेच झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त टिकतात. घरात आणल्यावर दोन-तीन दिवस ही फुले कोमेजत नाही. या सोबत विविध रंग, एकाच रंगामध्येही विविध छटा, पाकळ्यांचे लहान-मोठे, टोकदार-पसरट असे आकर्षक आकार या सर्व गुणांमुळे झेंडूच्या फुलांच्या सहाय्याने केलेली सजावट अतिशय खास बनते आणि दिसते.

आयुर्वेद आणि झेंडू | Ayurved and Marigold

झेंडूच्या फुलांचे धार्मिक कार्यात आणि सजावटीसाठी असलेले महत्त्व सर्वश्रूत आहे. त्यासोबत आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातूनही झेंडूचे महत्त्व आहे. झेंडूमध्ये रेझिन, कॅरोटेनॉईडस्, फ्लेव्होनॉईडस्, स्टेरॉल, म्युसिलेज आणि सॅपोनीन ( Resins, carotenoids, flavonoids, sterols, mucilage and saponins ) हे घटक असतात. झेंडू बलवर्धक असतो. तो स्वेदल, कृमिनाशक ( Deworming ) आहे. झेेंडूमुळे पित्त ( Bile ) या पाचक रसाच्या निर्मीतीला चालना मिळते. आमांश दाह आणि अल्सर ( Dysentery and ulcers ) यावर सुद्धा झेंडू गुणकारी आहे.

झेंडूच्या पानांचा उपयोग |  Use of Zandu leaves

झेंडूची पाने केसतूट आणि कानपुळीत लावण्यासाठी उपयुक्त असतात. काही ठिकाणी क्षयावर झेंडूच्या पानांचा उपयोग केला जातो. डोळे येणं, कान ठणकणं इत्यादी आजारांवर झेंडूच्या पानांचा रस वस्त्रगाळ करून वापरला जातो. हा पानांचा रस दोन-दोन थेंब कानात टाकल्यावर कानाच्या वेदना कमी होतात. रक्तशुद्धीसाठी ( Purification of blood ) झेंडूचा रस आयुर्वेदातील विशिष्ट अशा पद्धतीने संस्कारित करून आणि त्यासोबत काही द्रव्यांची मात्रा देऊन रोग्याच्या पोटात घेण्यासाठी दिला जातो. व्हेरिकोज व्हेन्स Varicose veins या रक्तवाहिन्यांच्या बिघाडावर झेंडू उपयोगी आहे. तसेच झेंडूची पाने गळवे आणि काळपुळी यावर उपयोगी असतात. झेंडूची पाने मुळव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर ( On hemorrhoids, kidney pain and muscle pain ) उपयुक्त आहेत. झेंडूचे सेवन केल्यास रक्ती मूळव्याधी असणार्‍यांना खूपच फायदा होतो. तसेच मुतखडा विरघळण्यास झेंडू उपयोगी असतो. लिव्हरची सूजही ( Inflammation of the liver ) झेंडूने दूर करता येते. अंघोळीच्या पाण्यात काही वेळ झेंडूची पाने टाकून मग या पाण्याने अंघोळ आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त मानली जाते.

झेंडूच्या फुलांचा उपयोग | Uses of marigold flowers

जखम व मुकामार यावर झेंडूच्या फुलांचा वाटून लेप उपयोगात आणल्यास सूज व वेदना त्वरित कमी होतात. झेंडू मलेरियाच्या डासांचाही नाश करतो. झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. ही फुले अपस्मार आकडीत उपयोगी आहेत. फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात.

कॅलेंड्यूला | Calendula

झेंडूच्या फुलापासून रस काढून कॅलेंड्यूला हे औषध तयार होते. फुलांचा औषधी उपयोग डोळे येणे या विकारावर आणि दूषित व्रणांवर (जखमांवर) होतो. इंटरनेटवरील माहितीच्या आधारे असे समजतेकी कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाल्यानंतर, स्त्रिया बाळंत झाल्यानंतर ( After delivery ), सिझरीन झाल्यानंतर पोटात घेण्यासाठी कॅलेंड्युला हे औषध डॉक्टर देतात आणि शस्त्रक्रियेच्या जखमेवर लावायलाही झेंडूच्या रसाचे हेच औषध उपयुक्त असते. ब्लड कॅन्सर म्हणजेच रक्ताच्या कर्करोगासारख्या विकारातही पोटात हा रस घेतला तर चांगले परिणाम दिसतात. कॅलेंड्युलाचा सर्वात जास्त दखल घेण्यायोग्य गूण म्हणजे त्याचा भाजलेल्या जखमांवर - On burn wounds होणारा फायदा. कॅलेंड्यूला या औषधामुळे जखमेतून विषबाधा होत नाही आणि भाजलेली जखम लवकर बरी होते.

झेंडूच्या फुलांचा चहा | Marigold Tea

तुळशी, गवती चहा, इलायची, आले, लवंग, काळीमिरी यापैकी सर्व किंवा एखादा घटक टाकून चहाचा आस्वाद सर्वांनी घेतला आहे. आता आपण आरोग्याच्या दृष्टीने झेंडूच्या फुलांचा चहा सुद्धा विचारात घ्यायला हवा. झेॅडूची निरोगी फुले योग्य पद्धतीने वाळवून त्याचा वापर चहासाठी करता येतो. चहा उकळण्यापूर्वी पाण्यात झेंडूच्या फुलांच्या सुकवलेल्या पाकळ्या मिसळतात. असा चहा पोटातील कृमी, आतडयांची जळजळ ( Inflammation of the intestines ), यकृताचे विकार ( Liver disorders ) , कावीळ ( Jaundice ), डायरिया ( diarrhea ) , यासाठी उपयोगी आहे. आता तर झेंडूचा स्वाद असलेली रेडीमेड चहा पावडर काही ठिकाणी उपलब्ध झाली आहे. अगदी जास्त किंमतीच्या चहापासून ते ग्रीन टी ( Green Tea ) पर्यंत अनेक पर्याय यात उपलब्ध आहे. अशा चहाच्या सेवनाने पोटातील गॅसेसचा ( Flatulence ) , पोटात अचानक कळ ( Sudden key in the stomach ) येण्याचा त्रास कमी होतो, असे चहा पावडर बनविणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे.

झेंडूच्या फुलांचा रस | Marigold Flower Juice

च्यवनप्राश सर्वश्रूत आहे. तसेच आंब्याचा रस, लिंबू सरबत असे प्रकारही नवे नाहीत. आता त्यात आणखी एका रसाचा आपण आस्वाद घेण्यास सुरूवात करण्यास हरकत नाही. हा रस म्हणजे झेंडूच्या फुलांचा रस. झेंडूच्या फुलांसोबत गाजर, सफरचंद व मध ( Honey ) मिसळून त्यांचा रस तयार केला जातो. हा रस औषधी असला तरी चविष्ठ असतो. वजन कमी करणे, चामखीळ व खरूज ( Warts and scabies ) अशा आजारांवर हा झेंडूच्या फुलांचा रस फायदेशीर असतो.

उत्तम त्वचेसाठी झेंडू | Marigold for better skin

झेंडूची पेस्ट त्वचेवर लावल्यास सूज, लालसरपणा आणि कोरडेपणापासून ( Swelling, redness and dryness ) आराम मिळतो. त्वचेचे जळणे आणि पुरळ ( Burning and acne of the skin ) सारख्या आजारांवरही ही पेस्ट उपयुक्त आहे. त्वचेसाठी झेंडूच्या पाकळ्यांचा उपयोग होतो. झेंडूच्या निरोगी पाकळ्या योग्य पद्धतीने वाळूवन त्याची बारीक पूड ( Fine powder ) केली जाते. नंतर ही पूड खोबरेल तेलात मिसळून मंद आचेवर गरम करावे. थंड झाल्यावर हे तेल त्वचेवर लावण्यायोग्य होते. झेंडूच्या फुलामध्ये ऍण्टीसेप्टिक, ऍण्टीबॅक्टेरिअल ( Antiseptic, antibacterial ) गुणधर्म असल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. नवीन येणारी त्वचा निरोगी बनते.

    तसेच डायपरमुळे लहान मुलांच्या त्वचेवर रॅशेस ( Rashes ) तयार होतात, झेंडूचे तेल तेथे लावल्यास आराम मिळतो. त्वचेवर वरच्या वर जखमा म्हणजेच खरचटलेल्या जखमा जळजळ आणि सूज अशा संवेदना देत असतील तर यावर झेंडूचे तेल उपयुक्त आहे. अशा जखमांमुळेे गँगरीन Gangrene होणार असे निदर्शनास येत असेल तर त्यावर झेडूचा रस उपयुक्त आहे. झेंडूच्या रसामुळे कोणत्याही जखमेतून विषबाधा होत नाही. याशिवाय त्वचेवर रिऍक्शन 9 Reaction ) झाल्यासही हे तेल वापरता येते. व्हॅसलिन ( Vaselin ) आणि झेंडूच्या पानांचा रस एकत्र करून लावल्यास हाता-पायांची शुष्कता ( dryness ) कमी होते.

मुळव्याधीवर झेंडूच्या फुलांचा रस उपयुक्त | Marigold juice useful for hemorrhoids

झेंडूच्या फुलांच्या फक्त पाकळ्या काढून त्या वाटून त्याचा रस काढावा. तो रस अंदाजे १० मि. ली. घेऊन त्यात ३० ग्रॅम चांगले तूप घालून दिवसातून दोन वेळ सकाळ-संध्याकाळ असा घ्यावा. ह्या रसाचा पोटात घेण्यास व वरून बांधण्यास असा दुहेरी उपयोग करता येतो. दोन तीन दिवसात अपेक्षित चांगला परिणाम होतो. मूळव्याधीतून रक्त पडण्याचे कमी होत जाते आणि थांबते. मूळव्याधीची जागा सुजून वेदना होत असतील तर झेंडूची फुले वाटून त्यात तूप, हळद घालून ऊन करावे; चांगले ऊन झाल्यावर ते पोटीस मूळव्याधीवर बांधावे. ठणका थांबतो व मूळव्याध बरी होते.

    झेंडूच्या फुलांप्रमाणे पाने देखील मुळव्याधीवर उपयुक्त आहेत. झेंडूची पाने, थोड्या पाण्यात टाकून त्याची पेस्ट बनवावी. त्या पेस्टमध्ये पिठीसाखर मिसळून ते गाळून सेवन केल्यास मूळव्याधीपासून आराम मिळतो.

अनेक संदर्भांमध्ये तर बवासीरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी झेंडू एक वरदान म्हणून उल्लेख केलेले आहे. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या तळून त्याचे दिवसातून तीनदा सेवन केल्यास मूळव्याधीमुळे होणारा रक्तस्राव कमी होत जातो आणि नंतर थांबतो.

मूत्रविकारात उपयुक्त झेंडू | Marigold suitable for diuretic

मूत्रविकारात सुद्धा झेंडूच्या औषधी गुणधर्मांचा फायदा होतो. झेंडूच्या निरोगी पानांचा रस काढून त्यात पिठीसाखर ( Powdered sugar ) मिसळावी. हा रस दिवसातून तीनदा घ्यावा. त्यामुळे अडकलेली लघवी ( Stuck urine ) मोकळी होते.

दातांच्या विकारावर झेंडूच्या पानांची पेस्ट | Marigold leaf paste on tooth decay 

झेंडूच्या निरोगी पानांची पेस्ट तयार करता येते. या पेस्टने दात घासले तर दातांच्या विकारांवर आराम मिळतो. दातांच्या वेदना लगेच कमी होतात. विशिष्ट असे एक-दोन दातच ठणकत असतील तर झेंडूची पाने व फुले एकत्र वाटून त्याची गोळी दाताखाली काळी वेळ धरावी. चांगला परिणाम दिसतो.

दमा, श्‍वसनाच्या आजारांवर झेंडू उपयुक्त ( Marigold is useful for asthma and respiratory diseases )

सध्या त्या व्हायरसमुळे श्‍वसनांच्या आजारांवर खूप काही वाचायला मिळते. झेंडूच्या फुलांचे चूर्ण दमा आणि श्वसनाचे विकार ( Asthma and respiratory disorders ) असलेल्या रुग्णांना उपयुक्त आहे. झेडूच्या फुलांचं चूर्ण, त्यात दुप्पट साखर आणि एक चमचा दह्या असे दिवसातून तीनदा घ्यावे.

लचक आणि सूज | Flexibility and swelling

झेंडू वनस्पतीचे सर्व भाग म्हणजेच पान, फूल, फांदी, बी आणि मुळं या सर्व घटकांचा रस काढून तो लचक आणि सूज यावर लावल्यास चांगला परिणाम दिसतो आणि सूज कमी होते.

ऍण्टीरिपेलन्ट | Anti repellent

झेंडूमध्ये विशिष्ट असे रसायन असल्यामुळे झेंडूच्या झाडाजवळ गेल्यास एक तीव्र असा गंध येतो. फुलांपेक्षा झाडालाच तो गंध जास्त येतो. या वासामुळे काही किटक दूर पळतात. याच गुणधर्माचा वापर करून किड्या-मुंग्यांचे चावण्यावर या फुलाच्या पाकळ्याच्या पावडरचा समावेश असलेले ऍण्टीरिपेलन्ट तयार केले जाते.

इतर उपयोग- Other Uses 

झेंडू वनस्पतीपासून एक तेल मिळते आणि हे तेल अत्तरासाठी बेस म्हणून वापरतात. या तेलाचा जंतुनाशक आणि जीवाणूनाशक ( Disinfectant and bactericide ) म्हणूनही उपयोग होतो. युरोपमध्ये कोंबड्यांना झेंडूच्या पाकळ्या खायला घालतात, या पाकळ्या खाऊन कोंबड्यांच्या मांसाला एक सुंदर केशरी रंग येतो आणि अंड्याच्या बलकाला पण केशरी रंग येतो.
-------------------------------------
झेंडूची थोडक्यात माहीती-
मराठी- मखमल किंवा झेंडू
इंग्रजी -मारीगोल्ड
गुजराती -गुलहिरो किंवा मखमला
हिंदी -गेंदा, गुतोरा, कालगा, मखमली
संस्कृत-स्थूलपुष्प,संदू, झंडु;
शास्त्रीय नाव -Tagetes erecta.
--------------------------------------
निष्कर्ष ( Conclusion)-

झेंडूचे आफ्रिकन मेरीगोल्ड आणि फ्रेंच मेरीगोल्ड असे दोन मुख्य प्रकार आहेत. आफ्रिकन झेंडू उंच वाढणारा असतो. याचे खोड उंच वाढत असले तरी फ़ारसे मजबूत नसते. फ़ुले मात्र फ्रेंच मेरीगोल्डच्या तुलनेत मोठी असतात. फ्रेंचमेरीगोल्ड या प्रकारातील वनस्पतींची उंची कमी असते आणि फुले आकाराने लहान असतात.असे विविध उपयोग असलेल्या झेंडूची लागवड सहज आणि सोपी आहे. त्याचे उपयोग पाहता प्रत्येकाच्या परसबागेत झेंडू असायलास हवा.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author
---------------------------------------------
Image Source- 1) pexels-gm-rajib-3524048- Photo by GM Rajib from Pexels, 2) pexels-yugank-kulshrestha-3702363 Photo by Yugank Kulshrestha from Pexels

गुणकारी झेंडू | Marigold Health Benefits गुणकारी झेंडू | Marigold Health Benefits Reviewed by Yogesh Ramakant Bholane on ऑगस्ट १०, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Please comment here if you have any question.

Blogger द्वारे प्रायोजित.